
दिनांक 12/12/24
शिरदवाड
परभणी जिल्हा नांदेड येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारताचे संविधान पुस्तकेची सोपान दत्तात्रय पवार व त्काही नराधमांनी जाणून-बुजून तोडफोड करून संविधान पुस्तकेची विटंबना केली व जातीवादी तेड निर्माण व दंगली घडवण्याचा प्रकार केला व दलित वस्ती मध्ये जाऊन पोलीस प्रशासनाला हाताशी धरून कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले व दलित वस्तींमध्ये नागरिकांना मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.
या सर्व घटनेमागचा सूत्रधार कोण आहे हे पोलिसांनी लवकरात लवकर शोधून काढावे व त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी व झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज शिरदवाडमध्ये निषेध म्हणून शांततेच्या मार्गाने गाव बंद करण्यात आले व त्या आरोपीस लवकरात लवकर शिक्षा व कठोर कारवाई करावी असे निवेदन कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे पि आय फडणीस साहेब यांना देण्यात आले. व शांततेच्या मार्गाने संविधानिक पद्धतीने गाव बंद करून निषेध केला.
यावेळी शिरदवाड गावचे सर्व ग्रामस्थ बौद्ध समाजातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
Discussion about this post