
श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी :- राहुल कोठारे (8600650056 )
आधुनिक काळात शिक्षणाच्या पद्धती बदललेल्या असून आजच्या गतिमान युगात शिक्षण देखील बदलणे गरजेचे असते. तरच प्रगती होऊन मुले स्पर्धेच्या युगात टिकाऊ धरू शकतात. याच गोष्टीचा विचार करून पारगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. सुरेखाताई दत्तात्रय (माऊली) हिरवे, यांनी पारगाव ग्रामपंचायत खाली येणाऱ्या सर्वच शाळांना इंटरॅक्टिव्ह पॅनल देण्याचा निर्णय घेतला. यासाठी मोठ्या रकमेची गरज होती. परंतु तरीही १५वा. वित्त आयोगाच्या निधीतून त्यांनी शाळांना इंटरॅक्टिव्ह पॅनल देण्याचा निर्णय केला. पारगाव च्या मुलांना आधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी व त्यांच्या संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येऊन ६ इंटरॅक्टिव्ह पॅनल एकच वेळी विकत घेऊन शाळांमध्ये त्यांचे वितरण केले. या इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या वितरण समारंभाच्या वेळी श्रीगोंदा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. सत्यजित मच्छिंद्र साहेब, केंद्रप्रमुख उधार साहेब. पारगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी घोरपडे भाऊसाहेब, तसेच पंचायत समितीचे माजी सभापती शहाजी हिरवे, ग्रामपंचायत सदस्य डायरेक्टर बाळासाहेब जगताप, राहुल आल्हाट, संजय मडके, मच्छिंद्र कापरे, विलास गोरखे, संजय कांडेकर, मंगेश घोडके, सौ.विजया खेतमाळीस,
तसेच विविध शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुवर्णाताई कापसे, संदीप बोठे, नारायण खेतमाळीस, वाल्मीक मोटे, शंकर सप्ताळ, आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना पारगाव ग्रामपंचायतीचे सरपंच पती दत्तात्रय ( माऊली ) हिरवे यांनी जिल्हा परिषद शाळांचा दर्जा हा निश्चित चांगला असून शिक्षक हे चांगल्या दर्जाचे आहेत. असे मत व्यक्त केले. परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी मार्केटिंग वाढविण्याची गरज असल्याचे देखील ते म्हणाले.
यावेळी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री लगड सर यांनी प्रास्ताविक केले, तसेच श्री शशिकांत मांगडे सर यांनी सूत्रसंचालन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक श्री. क्षीरसागर सर, श्री. झेंडे सर, श्री. सोनवणे सर, श्री. खामकर सर, श्री. राहुल कोठारे, श्रीम. जरांडे मॅडम, श्रीम. थिटे मॅडम, श्रीम. जगताप मॅडम, श्रीम. कांडेकर मॅडम, श्रीम. काळे मॅडम, श्रीम. शिंदे मॅडम, यांनी प्रयत्न केले..
Discussion about this post