
ता.प्र.सुबोध आखाडे..
आज डोणगाव पोलीस स्टेशन येथे परभणी येथे झालेल्या संविधान पुस्तकाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली त्याचा निषेध म्हणून डोणगाव पोलीस स्टेशनला दिले निवेदन.
काल परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोरील संविधान पुस्तकाच्या प्रतिकृतीची तोडफोड एका अज्ञात इसमांकडून करण्यात आली हे जातीयवादी मानसिकतेतून तसेच बुरसटलेल्या विचारधारेचे लोक अशी कृत्य करून जातीय सलोखा बिघडवण्याचे षडयंत्र राबवत असतात.
या कृत्यामुळे समस्त आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या तरी हे कृत्य करणाऱ्या नराधमास कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा सर्व आंबेडकरी बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व अशा घटना पुन्हा घडू नये व येथील जातीय सलोखा अबाधित राहावा.
त्यावेळी डोणगाव येथील बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.
अरुण धांडे मामा, सुशील भाऊ गवई, निलेश सदावर्ते,राज वाठोरे सर, अविनाश भाऊ खोडके, गौतम बोरकर, रामचंद्र जाधव, भागवत बोरकर अमोल वाठोरे, रोहित वाघमारे तसेच समाज बांधव उपस्थित होते..
Discussion about this post