विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून ओळख असलेला दुसरबिड येथील जिजामाता सहकारी साखर कारखान्याची पाहणी केली.
सदर कारखाना पुन्हा सुरू व्हावा,या भागात रोजगार निर्माण व्हावा व शेतकऱ्यांच जीवनमान उंचाविण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा असल्याने हा कारखाना सुरू व्हावा अशी जनभावना आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा कारखाना एकतर वादात आहे त्यातच अवसायनात निघाल्याने सबंधित यंत्रणेने याची दोन वेळा लिलाव करून विक्री केली मात्र मागील एक लिलाव फसल्याने पुन्हा एकदा या कारखान्याची चर्चा सुरू झाली.
सद्या नगर जिल्ह्यातील श्री व्यंकटेश शुगर ग्रुप (जिजाऊ ग्रीन शुगर ) ने सदर कारखाना विकत घेतला असून आज व्यवस्थापनातील महत्वाच्या व्यक्तींबरोबर या कारखाना क्षेत्रात आढावा घेतला.
यावेळी साखर व संलग्न व्यवसाय सोडून इतर कोणत्याही उद्देशाने या कारखान्या कडे बघू नये तसेंच कारखाना सुरु करण्यासाठी माझ्या कडून प्रशासकीय स्तरावर मा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्फत लागेल ती मदत करण्यास मी सदैव तत्पर असल्याच याप्रसंगी आश्वासीत केल.
यावेळी कारखान्याचे संचालक अनिल मोहिते यांनीही कारखान्यातर्फे आपली भूमिका स्पष्ट केली व येत्या काळात कारखाना लवकरात लवकर कारखाना सुरु करण्याची ग्वाही दिली.
Discussion about this post