फुलंब्री पंचायत समिती कार्यालय अंतर्गत वाहेगाव येथे महिला बचत गट विषयक मार्गदर्शनपर शिबिरआयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी देवगिरी बँकेच्या संचालिका डॉ प्रज्ञा ताई तेल्हार, देवगिरी बँकेच्या संचालिका मंगलताई वाहेगावकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस ऐश्वर्या अभिषेक पा. गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती फुलंब्री कार्यालयाच्या वतीने वाहेगाव येथे या महिला बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होते तसेच सरकारच्या वतीने बचत गटांना विविध लाभ मिळत असल्याचे यावेळी बोलताना ऐश्वर्या गाडेकर यांनी सांगितले.
यावेळी तालुका व्यवस्थापक श्री. काथार सर, BMFI कुलकर्णी सर, प्रभाग सन्मयक साळुंके मॅडम, IBCB नलवडे सर, ICRP संगिता पळसकर,आरती गुशिंगे, सरला सिरसाट, सुनिता जगताप, कृषि सखी मनिषा श्रीखंडे, कृषी सखी ज्योती गोडवे, कृषी सखी कल्पना गवारे, कृषी सखी किरण जगताप त्यासह सरपंच पार्वती ताई पळसकर, उपसरपंच कृष्णा श्रीखंडे, ग्रामसेवक नाईक सर, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह परिसरातील बचत गटाच्या सभासद महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Discussion about this post