फुलंब्री :खरे सत्कारमूर्ती मीनसून तुम्ही आहात, असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार अनुराधा अतुल चव्हाण यांनी फुलंब्री येथील भाजपाच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ डॉ. नामदेवराव गाडेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, तालुकाध्यक्ष सांडू जाधव, शहराध्यक्ष योगेश मिसाळ, सविता फुके, शिवाजी पाथ्रीकर, अप्पाराव काकडे, विजय औताडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सर्वप्रथम भाजपाच्या वतीने नवनिर्वाचित आमदार अनुराधा अतुल चव्हाण यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.त्यानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सत्कार समारंभाला उत्तर देतांनी अनुराधा चव्हाण म्हणाल्या की, मी हरिभाऊ बागडे यांच्या पावलावर पाऊल टाकत विकास कामे करणार आहेत. मी आमदार नसून तुम्हीच आमदार आहात, हे समजून तुमच्या कोणत्याही समस्या असल्यास त्या सोडवण्यासाठी मी तत्पर प्रयत्नशील राहिल. माझा विजय तुम्ही घेतलेल्या मेहनतीमुळे झाला.
याची मला जाणीव आहे. आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करणार असून, हा कारखाना सुरू झाला तर त्याचा फायदा होईल. स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळेल. तुम्हीबारा वर्षांपासून पासून माझे काम पाहत आहे मी जी पहिली अनुराधा चव्हाण आहे तीच आमदार झाल्यावरही राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सर्वांना सोबत घेऊन भविष्यातील निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहे.
हरिभाऊ बागडे व रावसाहेब दानवे जे आदेश देतील त्या आदेशानुसार पुढे काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचित बोरसे यांनी केले तर प्रस्ताविक सांडु जाधव यांनी केले. यावेळी सर्जेराव मेटे, गजानन नागरे, ऐश्वर्या गाडेकर, मयूर कोलते, सुमित प्रधान, गोपाल वाघ, वाल्मीक जाधव, तारु आप्पा मेटे यांच्यासह अनेक कार्यकत्यांची व नागरिकांची उपस्थिती होती.
Discussion about this post