आज शनिवारी सकाळच्या सुर्योदयच्या मुहूर्तावर हा दत्त जन्म सोहळा मोठ्या उत्साहात सोनेसांगवी गावात ग्रामदैवत श्री हनुमान महाराज मंदिरात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने मंदिराला विविध प्रकारच्या फुलांची सजावट करण्यात आलेली होती. मंदिरातील सर्वच मुर्तींना अतिशय सुरेख असे गुलाब आणि शेवंतीच्या पुष्पाचे हार घालून सजावट करण्यात आलेली होती.
आज दिवसभरात मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली होती. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिराला विशेष रुप प्राप्त झाले होते.
सायंकाळी ठिक ०६:३० वा. सुप्रसिद्ध किर्तनकार माऊली महाराज पवार भांबार्डे यांचे मन भारावून टाकणारे दत्त जयंतीचे किर्तन त्यांच्या सुरेल आवाजात संपन्न झाले. त्यानंतर समस्त ग्रामस्थ सोनेसांगवी यांच्या कडून महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेले होते…!!!🚩🤝🙏
Discussion about this post