
आज दिनांक 14/12 /2014 रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये सुरक्षा व सुरक्षितता या उपक्रमाचे तालुकास्तरीय मुख्यद्यपकांसाठी प्रशिक्षण आयोजित केलेले होते. हा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई व स्किल ट्री कन्सल्टिंग लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद संचालक आर विमला मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबवण्यात येत असून छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण मॅम यांच्या सूचनेप्रमाणे आज प्रशिक्षण देण्यात आले असून, सुरक्षा आणि सुरक्षितता या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री.दिलीप स्वामी साहेब, जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी मा.श्री विकास मीना साहेब , शिक्षण अधिकारी श्रीमती जयश्री चव्हाण मॅडम, कन्नड तालुक्याचे गट शिक्षणाधिकरी श्रीमती श्री श्रीमाळ मॅडम, खुलताबाद तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.केवट सर तसेच skill tree limited चे जिल्हा समन्वयक महेश पाटील व पूर्ण team यांच्या उपस्थितीत कन्नड व खुलताबाद तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख आणि सर्व मुख्याध्यापक यांना skill tree यांच्या वतीने सुरक्षा आणि सुरक्षितता या विषयी प्रशिक्षण देण्यात आले असून , मा.जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर यानी सुरक्षा आणि सुरक्षितता ही देखील अतिशय महत्वाची आहे. असे त्यानी विविध उदाहरणे देऊन , आपण सुरक्षा आणि सुरक्षितता ही घरापासून ते शाळेपर्यंत आणि शाळेपासून ते घरापर्यंत कशी राखता येईल हे समजावून सांगितले व या प्रशिक्षणाचा शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना फायदा होईल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी साहेब व शिक्षणाधिकारी श्रीमती चव्हाण मॅडम यांनी व्यक्त केली..
Discussion about this post