


हा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई व स्किल ट्री कन्सल्टिंग लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे.या प्रशिक्षणात सोयगाव तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व आठ केंद्रप्रमुख उपस्थित होते. या प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट हे की, शाळा, पालक व शिक्षक या तिन्ही घटकांवर मुलांची जबाबदारी आहे.भावी पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याने त्यांची भूमिका महत्वाची असते.शालेय शिक्षणाबरोबर मुलांच्या शाररिक, मानसिक व भावनिक सुरक्षा जपन हे आपले कर्तव्य आहे.सर्व शाळांमध्ये सुरक्षेची संस्कृती रुजविण्याची गरज आहे.सुरक्षा आणि सुरक्षित शालेय वातावरण प्रदान करने हे अंतिम उद्दिष्ट आहे जे शिक्षकास त्यांचे मुख्य उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करतील.या प्रशिक्षणात शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा व सुरक्षितता अंतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक सुरक्षा, गुड टच – बॅड टच ,शौचालय रचना, शालेय इमारत रचना ,राईट टू एज्युकेशन आणि पोस्को कायदा यांचे प्रोजेक्टर द्वारे प्रशिक्षण देण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री आर. आर. आढाव ( गट शिक्षण अधिकारी सोयगाव) व आठ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री नितीन राजपूत (बनोटी),श्री अण्णा पोल (फर्दापूर), श्रीउमेश महालपुरे ( वडगाव),श्री दादाभाऊ सनांसे ( जरांडी), श्री जनार्दन साबळे ( साव.), श्री सचिन पाटील (गोंदेगाव), श्री विकास पवार ( तिडका), श्री फिरोज तडवी ( सोयगाव) हजर होते.बी ई ओ श्री आढाव सर यांनी सर्वांना शाळेच्या विकासासाठी नवीन उपक्रम सांगून सर्वांना मार्गदर्शन केले.पंचायत समितीतील विषयतज्ञ श्री परमेश्वर काठोरे यांनी मोलाचे सहकार्य केले. पंचायत समिती मधील श्रीमती पाटील मॅडम यांचीही उपस्थिती होती.स्किल ट्री चे प्रशिक्षक समन्वयक अविनाश हिवराळे , ता समन्वयक सागर दाभाडे , व त्यांची टीम अमोल राठोड,प्रणय कुलकर्णी, शुभम शिंदे, सुनील डफाळ,राजश्री काकडे व पूजा लोखंडे इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा लोखंडे यांनी केले तर प्रशिक्षण प्रमुख पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी श्री आढाव सर यांनी उपस्थितांच्या आभाराने कार्यक्रम संपन्न केला. तसेच सर्वांच्या सहकार्याने प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले..
Discussion about this post