महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाने भाजपावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाने धनगर समाजाला मंत्रीमंडळात स्थान न दिल्यामुळे समाजात मोठा संताप निर्माण झाला आहे. समाजाच्या विविध गटांनी एकमुखी होत भाजपच्या निर्णयावर कडवट टीका केली आहे.
समाजातील प्रमुख नेत्यांचा असा दावा आहे की, भाजपने धनगर समाजाला मंत्रीमंडळात स्थान न देऊन त्यांच्या राजकीय व सामाजिक मागण्या दुर्लक्ष केली आहेत. प्रमुख नेते प्राध्यापक आ. राम शिंदे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रीमंडळात समाविष्ट करण्याची मागणी जोर धरत आहे.
समाजातील नेत्यांचे म्हणणे आहे की, धनगर समाजाची नेहमीच भाजपला मतदानासाठी मदत केली आहे, परंतु या वेळी मंत्रीमंडळात स्थान न दिल्यामुळे समाजाचे मनोबल खूपच कमी झाले आहे. “जर भाजपाने हे लक्षात घेतले नाही आणि नेत्यांना योग्य स्थान दिले नाही, तर धनगर समाजाची नाराजी तीव्र होईल आणि भाजपला त्याचा फटका बसू शकतो,” असा इशारा दिला जात आहे.
धनगर समाजाच्या सर्व घटकांनी एकत्र येऊन या निर्णयावर आपला विरोध जाहीर केला आहे आणि समाजाचे न्याय हक्क आणि स्थान मिळवण्यासाठी आक्रमक होण्याची तयारी केली आहे.
Discussion about this post