
महाराष्ट्र विधानसभा याच्या अनुषंगाने मंत्री मंडळ शपथविधी मध्ये सातारा जिल्ह्यातील चार आमदार साहेबांची वर्णी लागली आहे, यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एक नंबर मताधिक्याने निवडून आलेले सातारा-जावली मतदारसंघाचे भाजपचे आमदार मा. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले तर दुसरे माण-खटाव चे भाजपचे आमदार मा. जयकुमार गोरे आणि शिवसेना शिंदे गटाचे पाटण मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री मा. शंभुराज देसाई , तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे महाबळेश्वर-वाई मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेले मा. मकरंद जाधव-पाटील यांनी मंत्री पदासाठी शपथ घेतली, त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मा. एकनाथजी शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून यांच्या पाठिशी उभे राहून येणाऱ्या काळात सातारा जिल्ह्याचा संर्वागिण विकास आणि विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. तसेच सगळ्या आमदार साहेबांनी असे म्हटले की, शपथविधी मध्ये मतदारसंघातील मतदारांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे खरा आशीर्वाद दिला आहे असे म्हटले आहे..
Discussion about this post