उटी:- औसा तालुक्यातील उटी (बु) येथील रहिवाशी व जोगण चिंचोली येथिल ग्रामपंचायत चे ग्रामपंचायत अधिकारी विशाल गोविंद लोंढे लिखित ‘तावरजेची पहाट’ हा त्यांचा काव्य संग्रह नुकताच प्रकाशित झाला.
सदरील काव्य संग्रहास पलपब साहित्य प्रकाशन संस्था तर्फे ह्यावर्षीचा राज्यस्तरीय “वि. स. खांडेकर साहित्य भूषण पुरस्कार 2024” हा नुकताच 15 डिसेंबर रोजी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे प्रधान करण्यात आला.
त्याच बरोबर फुलोरा कलेचे माहेरघर संस्थे तर्फे ह्या वर्षीचा “फुलोरा साहित्य सेवा पुरस्कार 2024” नुकताच 7 डिसेंम्बर रोजी प्रधान करण्यात आला.
गावचा गाढा समभाळात आपल्या भावना कवितेत उतरून त्यांनी विविध विषयांना हात घातला आहे.आपल्या कवितेतून विविध सामाजिक, कौटुंबिक, पर्यावरण, ह्या सारख्या विषयांवर आपले मत कवितेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे. तसेच त्यांच्या ह्या काव्य संग्रहास अखिल भारतीय साहित्य मंडळ ठाणे तर्फे साहित्य भूषण पुरस्कारासाठी निवड झाली असून येत्या 29 डिसेंबर रोजी वितरण सोहळा सातारा कराड येथे आयोजित केला आहे.
त्यांच्या ह्या यशाचे कौतुक विविध स्तरातून होत आहे.चिंचोली जोगण च्या सरपंच सौ सिंधुताई कोंडमगिरे, उपसरपंच सोनाली भुजबळ, सदस्य:-बालाजी बिराजदार, सुनील भुजबळ,सतीश निकम, जयश्री मस्के,प्रभावती कारागीर,राजश्री बिराजदार,फिरोस भोसके, यांनी अभिनंदन केले आहे. शिवाय पंचायत समिती चे गट विकास अधिकारी श्री युवराज म्हेत्रे साहेब यांनी ही विशेष कौतूक केले आहे.
Discussion about this post