

भरत पुंजारा..
ग्रामीण प्रतिनिधी, पालघर..
डहाणू विभागातील ग्रामीण भागात सर नेस वाडिया फाउंडेशनच्या पुढाकाराने कावेरी जातीच्या अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे वितरण करण्यात आले. या योजनेत 240 लाभार्थ्यांना 15 कोंबड्यांचे वाटप करण्यात आले, ज्यामध्ये 12 मादी आणि 3 नर कोंबड्यांचा समावेश आहे.
धानिवरी, ओसरविरा, डहाळे, कांदरवाडी, देऊर, दहिगाव या गावांतील कुपोषित बालके, गरोदर व स्तनदा माता, विधवा महिला, अपंग व्यक्ती, तसेच भूमिहीन शेतकरी यांना लाभ देण्यात आला.
कुपोषित बालके व मातांना पोषण उपलब्ध करणे.
विधवा, अपंग आणि भूमिहीन शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे.
कावेरी जातीच्या कोंबड्या वर्षाला 200 ते 230 अंडी देतात, ज्यामुळे लाभार्थ्यांना पोषणाचा तसेच आर्थिक लाभ होईल. लाभार्थ्यांना कोंबड्यांच्या संगोपनासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रशिक्षणही देण्यात आले.
हा उपक्रम सर नेस वाडिया फाउंडेशनच्या जनरल मॅनेजर कुशाला शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ओंकार घरत, विक्रांत जाधव, संदीप पिलेना, सचिन झाटे आणि सुनिल हाडळ यांनी मोलाचे योगदान दिले..
Discussion about this post