१. एसटी आरक्षण नाही
२. आदिवासी सवलती नाहीत
३. गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्री बनवले नाही
४. लक्ष्मण हाके यांना विधान परिषदेवर घेतले नाही
वंजारी -3 मंत्री पदे
बंजारा – 2 मंत्री पदे
माळी – 2 मंत्री पदे
धनगर – 1 मंत्री
ओबीसी च्या बाजूने राज्यभर आक्रमकपणे बाजू घ्यायला प्रकाशांना शेंडगे महादेव जानकर गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके आणि मंत्रीपदे मात्र मराठा व इतर जातींना
जत मतदारसंघ मध्ये जाहीरपणे सांगितले तुम्ही गोपीचंदला निवडून द्या मी त्यांना मंत्रीपद देईल. पण धनगर समाजाच्या एकाही आमदाराला भाजपा मंत्री बनवू शकले नाही.
पक्ष कोणताही असो पडळकर साहेब आमचे नेते आहेत. त्यांना मंत्रिमंडळात न घेणे म्हणजे समाजाचा अपमान आहे. हा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही. त्यामुळे भाजपचा आम्ही जाहीर निषेध करतो. समाज बांधवांनो, तुम्ही कोणत्याही पक्षाचे असोत पेटून उठा नि भाजप पक्ष प्रमुखांना जाब विचारा व ठिकठिकाणी जाहीर निषेध आंदोलन करा.🙏
ज्या महायुती सरकारला धनगर समाजाने भरभरून मते दिली त्या महायुती सरकारला धनगर समाजाचे नेते चालत नाही का, या महायुती सरकारने दोन कोटी धनगर समाजाचा केसाने गळा कापला आहे आणि अपमान केला आहे,येणारा काळ महायुतीला दाखवून देईल धनगर समाज काय चीज आहे, गेले ते दिवस एक मंत्री पद दिले की धनगर समाज खुश होईल आम्हाला आमच्या लोकसख्येनुसार मंत्री पदे पाहिजे आहे येणाऱ्या निवडणुकीला तुम्हाला दाखवून देईल धनगर काय चीज आहे.
✍✍✍✍✍✍✍✍
राजकीय परिवर्तन परिषद..
सत्तेत आणायला बीजेपीस धनगर चालतो.
सत्ता चालवायला नको.
निवडणुकीत भरभरुन मते द्यायला धनगर चालतो.
धनगरांच्या मतामुळे बीजेपीस खुर्च्या मिळाल्यावर त्या खुर्च्याचा भागीदार मात्र धनगर नको.
राबायला आम्ही आणि मलिद्याला फक्त तुम्ही…
हा जमातीवरील अन्याय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतपेटीतून व्यक्त झालेला दिसेल.
येणार्या जिल्हापरिषदा आणि इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांत ती मते मागायला धनगर जमातीस या…
मत्रीपदापासून दूर ठेवल्याचा धनगर जमातीचा रोष स्थानिक स्वराज्य संस्थांत पहा.
विधानसभेत वाजवी यश मिळालेले बीजेपी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केवळ धनगर मतामुळे दिवसा चांदण्या बघायला लावू.
Discussion about this post