रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या रिपब्लिकन सोशल मिडिया व आयटी सेल गुहागर तालुका अध्यक्षपदी आबलोलीचे पत्रकार .संदेश कदम यांची नियुक्ती..!
राम भोस्तेकर माणगाव
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या रिपब्लिकन सोशल मिडिया व आयटी सेल गुहागर तालुका अध्यक्षपदी आबलोलीचे पत्रकार संदेश तुकाराम कदम यांची नियुक्ती करण्यात आली असून तसे नियुक्ती पत्र पत्रकार श्री.संदेश कदम यांना पाठवीण्यात आले आहे.या पत्रात असे म्हटले आहे की ,पत्रकार संदेश कदम आपल्याला हे कळवीताना आम्हांला आनंद होत आहे की, रिपब्लिकन सोशल मिडिया व आयटी सेलच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे.आपल्या कडून पक्षाला असलेल्या अपेक्षा
आपण निश्चितच पूर्ण कराल ह्याचा आम्हांला पूर्ण विश्वास आहे.राष्ट्रीय अध्यक्ष नाम.डॉ.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आपण आपल्या नव्या भूमिकेत उत्कृष्ट योगदान देऊन,पक्ष संघटना बळकट कराल ह्या विश्वासासह आंम्ही आपल्याला मन:पुर्वक शुभेच्छा देतो असे
लेखी नियुक्ती पत्र आयटी सेलचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष प्रशितोष कदम यांच्या सहिने पत्रकार संदेश कदम यांना पाठवीण्यात आले असून पत्रकार .संदेश कदम यांचेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका गुहागर या राजकीय पक्षांचे वतीने तसेच गुहागर तालुक्यातून सर्वच समाजातील सामाजिक, धार्मिक संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून आणि विविध पक्षांच्या राजकीय कार्यकर्त्यांकडून व आबलोली पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत
Discussion about this post