Cr.. anikesh vidhate 9422278333
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने राज्यभरात नाट्य जागरचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिवसापासून पुढील चार दिवस धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दि. 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या कालावधीत नाट्य जागर होणार आहे .
या नाट्य जागर मध्ये लावणी मोहत्सव , वेगवेगळी नाटके,सुगम संगीत व लोककलावंत यांचा मेळावा हे कार्यक्रम होणार आहेत.
धाराशिव शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या नाट्य जागर चे उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, धाराशिव तालुक्याचे आमदार कैलास पाटील व तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबसे यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यकारी नियामक मंडळ सदस्य विशाल शिंगाडे यांनी दिली..
Discussion about this post