वैजापूर प्रतिनिधी अर्जुन शिंदे.
दि.२० डिसेंबर रोजी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रामध्येच करण्यात आली.
राष्ट्रसंत गाडगे बाबाचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ शेडगाव ता. दर्यापूर जिल्हा अमरावती येथे झाला. मृत्यू. दि.२० डिसेंबर वलगाव अमरावती येथे झाला.
गाडगे बाबांचे कार्य
उपदेश साधा आणि सरळ होता चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका, असे ते त्यांच्या कीर्तनातून लोकांना सांगत असे.
देव दगडात नाही तर माणसात आहे. हे त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.
गाडगे महाराजांची शिकवण काय होती तर,
तिर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, असे सांगत दीन दुबळे, अनाथ अपंगाची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगे महाराज
,”देवळात जाऊ नका,”मूर्ती पूजा करू नका, सावकाराची कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी पुराने, मंत्र तंत्र देवर्षी चमत्कार असल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली.
गाडगे महाराज गावागावात जाऊन त्यांच्या करताना तो स्वच्छता शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व सांगायचे. गावात वस्तीवर जाऊन स्वच्छतेचे महत्व सांगायचे आणि अंधश्रद्धा दूर करायचे.
गाडगे बाबांचा देवाची सेवा करण्याची पद्धत
संत गाडगेबाबा गरीब दुःखी लोकांमध्ये त्यांनी देव बघितला त्यांची सेवा करणे हेच त्यांनी देवाची सेवा करण्याची मार्ग होता.
त्यांची समाधी अमरावती येथे आहे.
Discussion about this post