
वाळूज प्रतिनिधी – 30 डिसेंबर रोजी मुंबई विज्ञान अध्यपाक मंडळ(MSTA) तर्फे राज्यभरात डॉ होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा इयत्ता 6 वी व इयत्ता 9 वीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमातून लेखी,प्रात्यक्षिक, प्रकल्प आणि मुलाखत या चार टप्प्यात घेतली जात आहे पैकी लेखी स्पर्धेत राजा शिवाजी विद्यालयातील एकूण 13 विद्यार्थी सहभागी झाले.
पैकी 5 विद्यार्थी स्पर्धेत उत्तीर्ण झाले. स्वरा साईनाथ काळे(इ. 6 वी),सिद्धांत विजय कोल्हे (इ 6 वी),साईनाथ रमेश सरकटे(इ 9वी),अश्वमेध यशवंत सोळंके(इ 9वी),अथर्व महारुद्र किर्दात (इ 9वी) त्याबद्दल संस्थेचे सचिव जाधव ए.के ,मुख्याध्यापिका जाधव व्ही.के,पठाण ई.डी. डॉ.गायकवाड बी.जी,सोमासे आर.आर,पाटील ए एम तसेच विज्ञान शिक्षक शेटे एस.ए,जाधव के.ए,घटकर आर.बी,मोरे ए.एस,पाटील जी.आर, कोऱ्हाळे व्ही.के, राजे पी.आर,साबळे एस.ए.आदींचे मार्गदर्शन लाभले या विद्यार्थ्यास प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला..
Discussion about this post