- चित्रकला ग्रेड परिक्षेपासुन वंचित,शालेय व्यवस्थापन समितीची निर्देशांकास सेवेतून निलंबित करण्याची मागणी
सोयगाव
येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत सहावी आणि सातवी इयत्ता मध्ये शिक्षक घेत असलेल्या एकशे सव्वीस विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाने नियुक्त केलेल्या रविंद्र राजपूत या कला निर्देशक महाशयांनी गेल्या एक महिन्यापासून मुख्यापकाला पुर्व सुचना न देता एक महिन्याची दांडी मारली आहे.दरम्यान चित्रकला ग्रेड परिक्षेपासुन बाल विद्यार्थ्यांना विचित ठेवल्याने शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांनी या निदर्शकास सेवेतून निलंबित करण्यात यावे अशी लेखी स्वरूपाची मागणी शिक्षणाधिकारी यांना केली आहे.
चित्रकला परीक्षेपासून विडीर्थ्याना वंचित ठेवणाऱ्या निदेशकाचे नाव रविंद्र सुमेरसिंग राजपूत असे या नाव आहे. दी.१९ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर पर्यंत निर्देशकांनी शाळेचे मुख्याध्यापक मोतिराम जोहरे यांना कुठलीही पुर्व सुचना, लेखी अर्ज न देता मनमानी करीत एक महीण्याची दांडी मारली. दरम्यान चित्रकला ग्रेड प्रशासनाने २४ ते २७ डिसेंबर २०२४ परिक्षा घेतल्या होत्या.त्यामुळे परिक्षेला एकशे सहविस पैकी एकही विद्यार्थी बसू शकला नाही, विद्यार्थ्यांना परिक्षेपासुन वंचीत रहावे लागले आहे.
शालेय समिती अध्यक्ष भागवत गायकवाड,विशाल कंडारे, अन्ना वाघ, सुनील ठोंबरे, व विद्यार्थ्यांनी १२ डिसेंबर रोजी गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव यांना लेखी तक्रार दिली आहे. आर्टिआयच्या नियमानुसार मुलांच्या सुप्त गुणांस वाव मिळावा म्हणून कला क्रीडा कार्यनुभव यावा म्हणून कला निर्देशक नेमलेले आहेत. मात्र कला विषयावर सुप्त गुणांनपासून विद्यार्थी वंचित ठेवलेल्या अश्या निर्देशकाला सेवेतून कार्यमुक्त करण्यात यावे अशी मागणी केली आहे . पूर्वीचे महाजनसर ह्या कला निर्देशांकांचीपुन्हा नव्याने नियुक्त करुन आम्हाला न्याय द्यावा आशीही मागणी पालकातून होत आहे.
कोट :
१९ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान निर्देशांक रविंद्र राजपूत पुर्व सुचना न देता गैरहजर होते , यांची अनियमितता शालेय समिती वेतागली त्याच प्रमाणे विद्यार्थी पालकही संतप्त होवून त्यांनी लेखी तक्रारी केल्या आहेत. म्हणून राजपूत यांनी गैरहजरी बाबत खुलासा करावा अशी लेखी सुचना देण्यात आली होती. त्यांनी १६ डिसेंबर रोजी शाळेतील शिक्षक हजेरी पटावर अचानक प्रकट होवून सही केली.याविषयीचा अहवाल वरिष्ठ अधिकारी यांना सादर करण्यात आला आहे.
— मोतीराम जोहरे
मुख्याध्यापक जि.प.कें.प्रा. शाळा सोयगाव
कोट :
निर्देशांक राजपूत यांनी एक महिना गैरहजर राहण्याचे कारण व माफीनामा मुख्याध्यापकांकडे सादर केला आहे.तुर्तास कारवाई टाळलेली आहे.
— रंगनाथ आढाव
गटशिक्षणाधिकारी पं.स. सोयगाव
Discussion about this post