येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेनुसार दिनांक १६ डिसेंबर ते १९ डिसेंबर पर्यंत पालक विद्यार्थी यांच्या क्रीडा स्पर्धां घेण्यात आल्या.या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजी नगर येथे पालकांनी मोठ्या प्रमाणात व उत्साहात सहभाग घेतला.
या स्पर्धांमध्ये पालक व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.यात कबड्डी, खो-खो, धावणे, क्रिकेट,संगीत खुर्ची व रस्सीखेच या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मंगळवारी सोयगाव तालुका गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव व केंद्रप्रमुख फिरोज तडवी साहेब यांनी पालक विद्यार्थी क्रीडा स्पर्धां जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे भेट देऊन स्पर्धेत विजेत्या मातांचा फुल गुच्छ देऊन सत्कार केला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक किरण कुमार पाटील, सहशिक्षक गोपाल चौधरी, प्रशिक्षक शिक्षक शुभम देसले यांनी परिश्रम घेतले. पालक शिक्षक क्रीडा स्पर्धांना शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजीनगर यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.त्याच बरोबर या स्पर्धा मध्ये अनेक वयस्कर मातानीही सहभाग घेतला.
Discussion about this post