सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद : आज दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी युवा ग्रामिण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार साहेब यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष लक्ष्मण टेकाळे साहेब यांच्या अध्यक्षते खाली एक बैठक संपन्न झाली यात माननीय श्री कुलदीप सुरोशे यांना पुसद तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे ही नियुक्ती युवा ग्रामिण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री गणेशजी कचकलवार साहेब यांच्या आदेशानुसार व श्री लक्ष्मण टेकाळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षेतेखाली देण्यात आली या बैठकीला जिल्हाध्यक्ष लक्ष्मण टेकाळे श्साहेब ज्ञानेश्वर मेटकर विनोद कांबळे कुलदीप सुरोशे सिद्धार्थ कदम अनिल पवार हे उपस्थित होते
श्रीमान कुलदिप सुरोशे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व तालुक्यात सुपरिचीत असल्यामुळे यांचे संघटनेला मोलाचे योगदान लाभले व त्यांच्या मनमिळावू स्वभाव तसेच प्रत्येकाला सोबत घेऊन चालणारे असल्यामुळे हि बाब संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी । कचकलवार साहेब यांच्या लक्ष्यात आली असल्यामुळे आज कुलदिप सुरोशे यांना पुसद तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली आहे..!हे विशेष
Discussion about this post