दिनांक 18/ 12/ 24
शहर प्रतिनिधी नवीन पनवेल.
आदई सर्कल ते नवीन पनवेल रेल्वे स्टेशन या मधल्या जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये सकाळ व संध्याकाळ प्रचंड रहदारी असते. याच रस्त्याचे मध्ये खोदकाम केल्यामुळे येथील रहिवाशांना वाहतुकीचा प्रचंड त्रास होत आहे.
नवीन पनवेल रेल्वे स्टेशन ते आदई सर्कल पाच मिनिटे लागतात. आता तिथे जाण्यास पंधरा ते वीस मिनिटे लागत आहे. सकाळ पेक्षा संध्याकाळी रहदारी जास्त असल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
तरी लवकरात लवकर काम पूर्ण होऊन वाहतुकीचा मार्ग मोकळा होणे हीच अपेक्षा आहे.
Discussion about this post