दि. 19/12/2024 ते 21/12/2024 या कालावधीत स्वर्गीय सौं वासला वसंत पवार विद्यालयात शालेय खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये कब्बड्डी, खो-खो, लंगडी, क्रिकेट आणि इतर अनेक खेळांचा समावेश होता. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या खेळातील कला व कौशल्य प्रदर्शित करत स्पर्धांमध्ये भाग घेतला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष माननीय अनिल पाटील, संसदीय सचिव माननीय श्री अनंत सोगले, पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी श्री अनंत पाटील, श्री प्रफुल पाटील (उपसंपादक), किशोर पाटील (पोलीस पाटील, नावझे), पालक शिक्षक संघाच्या प्रतिनिधी सौं सायली पाटील, श्री विनोद अनंत पाटील (महाराज), शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती आशा फेगडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सर्व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनातून स्पर्धेचे आयोजन अधिक यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.





Discussion about this post