मराठी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पाटील खानापूरला स्नेहमेळावा….
राजकारण्यांनी आतापर्यंत देशातील गलाई बांधवांचा केवळ वापर करून घेतला. यापुढे गलाईबांधव आपला राजकारणात वापर करू देणार नाहीत.” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल पाटील यांनी आयोजित स्नेहमेळाव्यात व्यक्त केले.
तरुणांनी कोणताही व्यवसाय करत असताना जोडधंदा केला,तरच स्पर्धेच्या युगात टिकून राहता येईल,असेही ते म्हणाले.
खानापूर येथील कौतिका पॅलेसमध्ये प्रकाश जाधव यांचा गलाई व्यवसायातील ५२ वर्षांच्या प्रवासानिमित अखिल भारतीय मराठी गलाई बांधव असोसिएशनतर्फे स्नेहमेळावा.
आयोजित स्नेहमेळाव्यात प्रकाश जाधव यांचा सत्कार करताना गलाई बांधव.
व सन्मान सोहळा झाला.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अनिल पाटील, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष अजित शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, किरण हसबे, मधुकर भगत, राजू भोसले विजय सूर्यवंशी, दत्तात्रय बुलबुले, गोरख गायकवाड, विजय गायकवाड उपस्थित होते.
युवा उद्योजक राहुल जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रकाश जाधव यांच्या व्यवसायातील वर्षांच्या कार्याचा गौरव करून
मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रकाश जाधव म्हणाले,
‘बालवयातील खडतर परिश्रमानंतर आवश्यक असणारे शिक्षण आत्मसात करून गलाई व्यवसायाला मोठे स्वरूप आणण्याचा प्रयत्न सातत्याने केला. त्याचा लाभ युवा पिढीला झाला. भविष्यात युवा उद्योजकांना संपूर्ण विश्वात यशस्वी होण्याचे मार्गदर्शन करून समाजहित जोपासण्याचा प्रयत्न करणार
आहे.विविध मान्यवरांचा सत्कार झाला. वोविगो डेस्टिनेशन मॅनेजमेंट, ऑर्बिट गेटवेज टुरिझम, दुबई या कंपनीचे सादरीकरण झाले.
उद्योजक अमित भोसले, उज्वला पवार, मारुती पाटील, उत्तम जरे, बाळासाहेब रोंगे यांनी मनोगत व्यक्त केले. सतीश चव्हाण, माणिक आवलेकर, शिवाजी जाधव यांनी संयोजन.
Discussion about this post