
शरद जाधव :-
कदम वाक वस्ती : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर( तालुका हवेली) वडू बुद्रुक (तालुका शिरूर ) येथील ऐतिहासिक स्मारकाच्या कामाला गती देऊन ते काम प्रगतीपथावर आणावे अशी मागणी शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी विधानसभेत करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः हा अधिवेशन संपल्यानंतर समाधी स्थळाला भेट देऊन कामाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती आमदार
विधानसभेत औपचारिक मुद्द्यावर आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी तुळापूर व वडू बुद्रुक येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाबाबत सभागृहात चर्चा केली. ते म्हणाले हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराजांचे हे ऐतिहासिक समाधी स्थळ आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शंभू भक्त दर्शनासाठी येत असतात छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे हे स्थळ असल्याने ते स्मारक ऐतिहासिक अशी व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे.
या भूमीचा विकास होण्यासह स्मारकासाठी शासनाने 269 कोटी रुपयांची भरगोस विकास निधी मंजूर करून दिला आहे. यास मार्गाचा विकास आराखडा झाला आहे. स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली मात्र गती संत असल्याने सातत्याने या ठिकाणी कामाला गती मिळून स्मारकाचे काम प्रगतीपथावर येणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
या समाधीस्थळाच्या विकास आराखड्याला तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,व अजित पवार, यांच्या मार्गदर्शकाखाली निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे तातडीने या स्मारकाचे काम व्हावे अशी मागणी केली. तर तुळापूर व आपटी दरम्यान शासनाने मंजूर केलेल्या पुलाचे काम मार्गे लावावे अशी मागणी चर्चेत केली.
दरम्यान आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी मागणीवर अजित पवार स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी अधिवेशन झाल्यानंतर मी स्वतः तुळापूर वडू बुद्रुक येथे भेट देण्यासाठी येणार असून त्या संबंधीच्या सूचना बांधकाम विभागाला देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले असल्याची माहिती आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.. 🙏
Discussion about this post