लोणार तालुका प्रतिनिधी :-सुनिल वर्मा
लोणार: येथील स्थानिक सीबीएसई शाळा लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीनदिवसीय वार्षिक क्रीडा संमेलन अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. १९/१२/२०२४ ते २१/१२/२०२४ दरम्यान करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अतिशय उल्हासाच्या वातावरणात पार पडला. उद्घाटनप्रसंगी लोणार नगरीतील विवीध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उद्घाटक या नात्याने लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमीष मेहेत्रे साहेब तर प्रमूख अतिथी शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदूभाऊ मापारी, लोणारचे गटशिक्षणाधिकारी जंगलसिंग राठोड व महमूद सेठ, नगर परिषद लोणार माजी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळाध्यक्ष मसूद शेख होते. यावेळी अन्य सन्मानित अतिथी मध्ये संतोष भाऊ मापारी कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार सभापती, शाळा उपाध्यक्ष शेख गफार, प्रा. गजानन खरात, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद,प्रा. फिरोज खान, मु. मजीद शेख, क्रीडा संयोजक विठ्ठल घारोड, हेड कॉन्स्टेबल संतोष चव्हाण, पत्रकार संतोष पुंड व तसेच शाळेचे मार्गदर्शक अफसर खान उपस्थीत होते. शाळा प्राचार्य दत्तात्रय कुलकर्णी व उपप्राचार्य शेख नबील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कोषाध्यक्ष मो. फैसल यांनी कार्यक्रम व स्पर्धेसाठी आवश्यक सर्व बाबींचा पाठपुरावा केला. पीआरओ अंकुश चव्हाण, कोच लियाकत अली व श्रीकांत कौठेकर तसेच समन्वयक गणेश राठोड, संदीप साळवे व प्रवीण परहाड यांनी कार्यक्रम यशस्वी केला. अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या पूर्णत्वासाठी मोठी भूमिका बजावली. .
स्कूल हेडबॉय अमित मापारी, हेड गर्ल भाविका भंडारी, अनुशासन कप्तान गायत्री नागरे व क्रिडा कप्तान सुशांत झोरे यांच्यासह अन्य विद्यार्थी परिषद सदस्यांनी शाळेच्या विविध क्रीडा स्पर्धांचे नियोजन केले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली यात सहभागी विद्यार्थिनींना शिक्षिका वैशाली खांडेभराड यांनी मार्गदर्शन केले तर स्वागतनृत्य मेघा साळवे, अर्चना मापारी व योगेश वानवे या शिक्षकांनी केले. पूर्वप्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी शिक्षिका शिल्पा कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मास पीटी प्रात्यक्षिक सादर केले.
हाऊस ऑब्जरवेशन, मार्च पास्ट, टॉर्च बीएरिंग, ओथ टेकींग कार्यक्रमाचे प्रमूख आकर्षण होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवीन बास्केटबॉल कोर्ट व क्रिकेट पीचचे उद्घाटन करण्यात आले. विविध वैयक्तिक व सांघिक खेळ या क्रिडोत्सवामध्ये विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य व उमेद आणले आहेत व त्यांच्यातील अंगभूत गुणांना वाव देणारे ठरले आहेत. कार्यक्रमाचं संचलन श्रावणी सांगळे, दिपाली जाधव व अदिती जाधव या विद्यार्थीनींनी केलं.




Discussion about this post