नेहमीच चर्चेत राहिलेल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेतील एक घटक म्हणजे कुपवाड शहर विभागीय कार्यालय तेथील कार्यालयीन कारभार नेहमीच चर्चेचा विषय असतो. मग कोणताही विभाग असो नागरिकांना हेलपाटे मारणे हे सवयीचे झाले आहे. या भोंगळ कारभाराचा प्रत्यय नुकताच पाहण्यात आला. कुपवाड विभागीय कार्यालयात नगररचना विभागातील विभागामध्ये एका नागरिकांना हा प्रत्यय आला. नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या सांगलीतील ‘मिटिंग’ चे कारण नेहमीप्रमाणे समोर आले. तर बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी लागणाऱ्या ना हरकत दाखल्यासाठी भाग नकाशा आणि झोन दाखला मिळण्यासाठी अर्ज दाखलही करून घेण्यास तेथील कर्मचाऱ्यांनी साधी तसदी घेतली नाही कारण समोर आले पावती बुक संपले आहे सोमवारी या पावती करावी लागेल त्यात अपुऱ्या मनुष्यबळामुळे मिरजेचे अनुरेखक हे मिरज आणि कुपवाड आठवड्यातून काही दिवस दोन्ही कार्यालयांना वेळ देतात. त्यामुळे आता हे दोन्ही दाखले मिळण्यासाठी नव्या वर्षाची वाट पहावी लागणार असे मनात ठरवत एक गरजू नागरिक तेथून परत फिरले. दुसरी निदर्शनास आलेली गोष्ट अशी नुकतीच आयुक्त शुभम गुप्तांनी मालमत्ता करा संदर्भात महत्वाचे निर्णय घेतले आहेत. कुपवाड शहरातील एक मालमत्तेला कर लावण्यासाठी नागरिक स्वतः हुन या कार्यालयातील घरपट्टी विभागामध्ये गेले तर खुर्च्या नेहमीप्रमाणे रिकाम्या होत्या ती मालमत्ता ज्या कर्मचाऱ्याच्या भागात आहे त्या ‘स्वामी’ नामक कर्मचाऱ्याला फोन वरून संपर्क केला असता त्याने तर चक्क सांगितले मी मिरज मध्ये मिटिंग साठी आलो आहे नंतर या तर मिरज मध्ये अशा पद्धतीची कोणती मीटिंगचं नसल्याचे निष्पन्न झाले. आता एकीकडे आयुक्त साहेब महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी एव्हडा आटापिटा करत आहेत मात्र अशा पद्धतीने कामे नागरिकांची रेंगाळली तर प्रशासनावरचा नागरिकांचा विश्वासच उडेल कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर अंकुशच राहिला नसल्याचे पुन्हा सिद्ध झाले. मात्र आपले वेतन वेळेत मिळण्यासाठी अट्टाहास असतो.
Discussion about this post