महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी महत्वाचा असलेला विभाग म्हणजे घरपट्टी विभाग नुकत्याच एक सर्वेक्षणानुसार तब्बल ४२ हजार मालमत्ता या घरपट्टी लागू ना झालेल्या आढळून आल्या मात्र आयुक्त शुभम गुप्ता (IAS) यांनी उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रथमपासूनच काही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली त्याचाच एक भाग म्हणून आणि मालमत्ता धारकांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने महापालिकेचे स्थायी उत्पन्न वाढ हि महत्वाची आहे. यासाठी महापालिका क्षेत्रातील नव्याने निर्माण झालेल्या मालमत्ता बांधकामात वाढ झालेल्या जुन्या मालमत्ता तसेच वापरात बदल झालेल्या मालमत्ता यांच्या करपात्र मूल्यांमध्ये आवश्यक बदल करण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने एका जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच रुजू झालेले अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी मालमत्ताचे सर्वंकष सर्वेक्षणासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध केली असून महापालिकेने सर्व मालमत्ता धारकांना नव्याने कराधान नियमानुसार विशेष नोटीस बजावण्याचे काम सुरु केले आहे. या नोटिसींवर येणाऱ्या हरकतींच्या सुनावणीची ठिकाणे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने निश्चित केली आहेत त्याप्रमाणे मिरजेतील मालमत्ता धारक हे मिरज विभागीय कार्यालय कर संकलन विभागामध्ये, कुपवाड मधील मालमत्ता धारक हे कुपवाड विभागीय कार्यालयातील कर संकलन विभाग आणि सांगली मधील मालमत्ता धारक हे जिल्हा परिषद समोरील महापालिकेच्या मंगलधाम या इमारती मधील कर संकलन विभागामध्ये उपस्थित राहू शकतात. नोटीसी मध्ये पुढे म्हणले आहे कि मालमत्ता धारकांनी या सुनावणीच्या ठिकाणांची नोंद घ्यावी आणि त्यावर विहित मुदतीत लेखी स्वरूपात प्राप्त हरकतींना यथा अवकाश सुनावणीसाठी दिनांक आणि वेळ लेखी स्वरूपात कळवली जाईल. .
Discussion about this post