विहिरगांव प्रतिनिधी :-रजत चांदेकर

सायबर टिमच्या मदतीने वडकी पोलिसांनी केली अटक. तलाठी कार्यालयात घुसून रात्री मुक्कामाला असलेल्या तलाठी लोहत यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना सिनेस्टाईल पाठलाग करत वडकी पोलिसांनी अखेर सायबर टिमच्या मदतीने 48 तासात जेरबंद केले. राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील मुख्यालयी असलेल्या मिलिंद लोहत या तलाठ्याला मारहाण करून घटनास्थळावरुन पसार झालेले आरोपी एम.एच.३२ वाय. ४४२० या क्रमांकाच्या स्विफ्ट कारने प्रथम पुणे तेथून अहमदनगर, संभाजीनगर कारंजा लाड, मुर्तिजापूर, दर्यापूर, अंजनगाव या मार्गाने पोलीसांना चकमा देत पळत असतांना अखेर सायबर टिमच्या मदतीने अचलपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्राम सिंधी जि.अमरावती येथून अटक करण्यात वडकी पोलिसांना यश मिळाले.हि अटकेची कारवाई २१ डिसेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान करण्यात आली असून प्रतिक दशरथ वाढोणकर (३४) रा.वाढोणा बाजार, सतिश बाबाराव मडावी (२५) दादा बादशहा नगर राळेगाव व प्रमोद मोतीराम सोनूले (२५) रा.वरध ता.राळेगांव अशी या प्रकरणातील संशयितांची नावे आहेत.हि अटकेची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात वडकी ठाणेदार सुखदेव भोरकडे पिएसआय प्रशांत जाधव दिपक वांड्रसवार किरण दासारवार आकाश कुदुसे विनोद नागरगोजे यांनी पार पाडली
Discussion about this post