तालुका प्रतिनिधी – समीर बल्की
पोंभूर्णा :-पंचर झालेला ट्रॅक्टर निष्काळजीपणाने रस्त्याच्या मधोमध उभा ठेऊन असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक झाल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.सदर घटना दि.२१ डिसेंबरला संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास बोर्डा बोरकर बेघर वस्तीजवळ घडली.मुकुंदा शंकर बुरांडे, वय ४५ वर्ष,रा. बोर्डा बोरकर असे मृतकाचे नाव आहे.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या कामावर गौण खनिजांची वाहतूक करण्यासाठी असलेला ट्रक्टर पंचर झाला म्हणून
बोर्डा बोरकर बेघर वस्तीजवळ ट्रॅक्टर चालक संपत मरस्कोले रा.चिंतलधाबा याने रस्ताच्या मधोमध निष्काळजीपणे पंचर झालेला मनोज निखारे रा.चिंतलधाबा यांच्या मालकीचा मंहिंद्रा कंपनीचा पुसट नंबर असलेला ट्रॅक्टर व ट्राली क्र.(एम एच३४ -एल.६३७०) उभा ठेवलेला होता.संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास मुकुंदा बुरांडे हा पोंभूर्णा येथून काम आटोपून बोर्डा बोरकर कडे आपल्या दुचाकी क्र.(एम एच ३४ सि.एच ८३७३ )ने जात असताना ट्रॅक्टरच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर किंवा टेललाईट नव्हते.
त्यामुळे दुचाकीस्वाराला रस्त्याच्या मधोमध असलेला ट्रॅक्टर दिसला नाही. त्यामुळे पाठीमागून दुचाकी ट्रॅक्टरला धडकली.यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. पोंभूर्णा पोलिसांनी पंचनामा करून ट्रॅक्टर चालक संपत मरस्कोले यांचेवर बिएनएस १०६/१,२८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक धनराज सेलोकर करीत आहेत.
मुकुंदा बुरांडे यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Discussion about this post