वणी – येथील श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थाद्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये महान गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव मा. ओमप्रकाश चचडा यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रा.श्री.महादेवजी खाडे अध्यक्ष मराठी विज्ञान परिषद , संस्थेचे संचालक श्री. विक्रंतजी चचडा ,श्री. अभय पारखी मुख्याध्यापक राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय वणी व शाळेचे प्राचार्य श्री. प्रफुल महारतळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाद्वारे प्रफुल महारतळे यांनी गणिततज्ज्ञ रामानुजन यांचे गणित क्षेत्रातील योगदान विषद करीत हा दिवस हा संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस असल्याचे निर्देशित केले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. प्रा. महादेवजी खाडे सरांनी विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेत दैनंदिन जीवनातील उदाहरणाद्वारे गणित विषयाचे महत्त्व पटवून देत अनेक गणितीय ट्रिकच्या माध्यमातून गणित विषयाला रंजक बनविले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. अभय पारखी सरांनी महान गणिततज्ज्ञ रामानुजन यांनी गणित विषयाला फक्त वेगळी ओळखच दिली नाही, तर त्यांनी अशी प्रमेय आणि सूत्र दिली ज्यांचा बळावर गणित क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून आला असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे संचालन सौ. प्रनोती खडसे मॅडम तसेच आभार प्रदर्शन श्री. सतीश बाविस्कर सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .
Discussion about this post