१८० देशांमध्ये कार्यरत असलेल्या, शैक्षणिक आणि मानवतावादी समजल्या जाणाऱ्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेतर्फे नुकताच जागतिक ध्यान दिवस सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या मुख्यालयामध्ये साजरा करण्यात आला. महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांना तणावमुक्त आणि आनंदी मनाने दैनंदिन कामकाज करणे सोयीचे होण्यासाठी जागतिक ध्यान दिवसाचे औचित्य साधून महापालिकेमध्ये आयुक्त शुभम गुप्ता यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिविंग च्या सहकार्यातून ध्यान दिवसाचे आयोजन केले गेले. महापालिकेमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये प्रथम धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन अति आयुक्त निलेश देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. आर्ट ऑफ लिविंग च्या शासन कार्यक्रम
जिल्हा समन्वयक आणि प्रशिक्षक सौ संगीता पाटील यांनी जागतिक ध्यान दिवस आणि ध्यान याबद्दल सविस्तर माहिती दिली, यावेळी आर्ट ऑफ लिविंग संस्थे तर्फे न या विषयी सर्वांना दृकश्राव्य मध्यमातून ध्यान धारणेबाबत माहिती देण्यात आली. यावेळी महापालिकेच्या उपायुक्त विजया यादव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ वैभव पाटील, सिस्टीम मॅनेजर आणि सहा आयुक्त नकुल जकाते, नगरसचिव सहदेव कावडे,जन संपर्क अधिकारी धनंजय हर्षद, आर्ट ऑफ लिविंग संस्थेचे स्वयंसेवक शिवाजी सावंत, पौर्णिमा पाटील तसेच महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post