पालघर जिल्ह्यातील खुटल येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे निकृष्ट इमारत बांधकाम सुरू आहे हे काम आदिवासी सार्वजनिक विभाग डहाणू यांच्या मार्फत नाशिक येथील कंत्राटदार अनिल येवले यांच्या समृद्धी कंट्रेक्शन यांना दिले होते, आदिवासी मुलींच्या शिक्षणाची आणि वसतिगृहाची सोय व्हावी अश्या विचाराने 2004 पासून पाठपुरावा करून ग्राम पंचायत खुटलं यांनी आपल्या गावातील गावठण हे मुलींच्या वस्तीगृहासाठी देण्यासाठी ठरवले व एकात्मिक आदिवासी विभाग आश्रम शाळा यांच्या नावे करून मुलींचे वसतिगृह व्हायला पाहिजे या साठी ग्रामपंचायत व शालेय कमिटी कार्यरत होते वन विभागाचा अनेक अडचणी असताना सुध्या 2 नोव्हेंबर 2024 रोची प्रशासकीय मान्यता मिळाल्याने तळमजल्यासह 3 मजल्यांची ऐकुन क्षेत्रफळ.2217.60 चौ. मी असून हे काम नाशिक च्या समृद्धी कंत्राटी यांना ९ कोटी ४० लाख १३ हजार १५४ रुपयांना निविदा मंजूर होऊन तसेच ५४० दिवसाची कामाची मुदत दिली आहे तरी राजकीय पाठबळ असल्याने ठेकेदाराचे कामाकडे लक्ष नाही असे जर निकृष्ट कामे केली आणि ऊद्या काही बरे वाईट झाले त्याला जबाबदार कोण असेल असे गावातील ग्रामस्थ दिलीप फरले व शाळा समिती सदस्य संजय करमोडा ,मिथुन करमोडा,प्रकाश फरले यांचे म्हणणे आहे

Discussion about this post