
आज दिनांक २३ डिसेंबर रोजी लोक सभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी परभणी येथील घटनेत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या आई व भावाला संवाद साधुन त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर नवा मोढां परभणी येथे पत्रकार परिषदेत बोलताना पोलीसाणिच सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या केली असा आरोप केला.
सोमनाथ सुर्यवंशी या युवकाच्या हत्येस केवळ पोलिस च जबाबदार असल्याचे स्पष्ट असुन या प्रकरणी विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री यांनी दिलेली माहिती पुर्णतः खोटी आहे असे नमूद करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संविधान विरोध धोरणच या सर्व घटना क्रमाना कारणीभुत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदे दरम्यान केला.लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधीं यांच्या सोबत प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार संजय जाधव, फौजिया खान,डॉ.राहुल पाटील,अमित देशमुख, सुरेश वरपुडकर, यशोमती ठाकुर, बाळासाहेब थोरात, सुरेश दादा देशमुख बाळासाहेब देशमुख माजी महापौर भगवान वाघमारे व महाविकास आघाडीचे नेते, आदी उपस्थित होते..
Discussion about this post