
वैभववाडी :
मांगवली ग्रामपंचायत सभागृहात नुकतीच ग्रामपंचायत मांगवलीची ग्रामसभा संपन्न झाली..यावेळी म.गांधी तंटामुक्त गाव समितीची निवड करण्यात आली.. गावातील युवा कार्यकर्ते ..सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले ..श्री.सचिन आयरे यांची समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली…या निवडीमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
गावातील सर्व तंटे हे निपक्षपणे आणि सर्वांना समान न्याय देण्याचे काम आपल्या सहकार्यातून करेन .गावातील तंटे गावातच मिटवावेत यासाठी प्रयत्नशील राहीन.यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे..असे यावेळी नूतन अध्यक्षांनी बोलताना म्हंटले.
मा.श्री.शिवाजी नाटेकर सरपंच मांगवली यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या सभेत श्री. कदम भाऊ ग्राम पंचायत अधिकारी, कमलाकर लिंगायत पोलिस पाटील आणि या सभेला ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते..
Discussion about this post