
जनसंघर्ष अर्बन निधी घोटाळा प्रकरण. सातही शाखेच्या खातेदार ठेविदार यांनी एकत्रित येऊन सहकार्य करावे..
मानोरा प्रतिनिधी / विशाल मोरे
मानोरा: आज सुलतानी संकटामुळे झालेली वित्तहानी भरून निघेल मात्र एखाद्यांचा जीव गेला तर भरपाई होणे शक्य नाही. या करिता मानोरा, कारंजा लाड,दिग़स,पुसद,दारव्हा, आर्णी,नेर परसोपंत या सातही शाखेच्या सुज्ञ खातेदार ठेविदार यांनी एकत्रित येऊन या संघर्षाच्या लढाईत साथ दिली तर यश मिळण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन मानोरा शहरातील जागृत संकटमोचन हनुमान मंदिर सभागृहात आयोजित सभेतून व्यक्त केले.यावेळी जनसंघर्ष अर्बन निधीच्या सर्व खातेदार ठेविदार, पुसद येथील वक्ते मंगेश तिडके,निधीचे शाखा व्यवस्थापक ओजस जैन,चेतन लोढीया,शेख सलीम शेख वजीर,जुनेद नुरा बागवान तर मानोरा शाखा व्यवस्थापक कृष्णा रणखाम,आंफीसर विवेक डूकरे, सचिन इंगोले,राम राऊत,गिरीश तापडीया, अशोक रत्नपारखी,मोहीत खोंड, राऊत, गणेश चिस्तळकर, राहुल लोंढे,निलेश चव्हाण, सोळंके आदींची उपस्थिती होती. जनसंघर्ष अर्बन निधी मानोरा अंतर्गत सर्व कर्मचारी,पिग्मी एजंट व खातेदार ठेविदार यांची संयुक्त सभा जागृत संकटमोचन हनुमान मंदिर सभागृहात २४ डिसेंबर रोजी घेण्यात आली. मंगेश तिडके म्हणाले की,सातही शाखामिळून सर्वांनी एकत्रीत येऊन कायदेशीर लढाई लढण्याकरिता निधी सुरक्षा समिती गठीत करण्याचे सर्वानुमते ठरले.ही समीती शासन, प्रशासन आणि न्याय मंडळ यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. दि.१७ डिसेंबर 24 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दिग़स पोलिस ठाण्यात अंतर्गत अपराध क़मांक ७४५/२४ कलम ४०६,४०९,४२०,१२० (ब)३४ भादवीसह कलमं (३) महाराष्ट्र ठेविदाराच्या हितसंबंधाचे संरक्षण १९९९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असतानाही अद्याप आरोपींना अटक करण्यात न आल्याने सर्व कर्मचारी पिग्मी एजंट खातेदार ठेविदार यांचे मध्ये आपले हक्काचे कष्टाचे पैसे परत मिळेल किंवा नाही हा संभ्रम निर्माण झाल्यामुळे प्रचंड आक़ोश निर्माण झाला आहे. या बैठकीस गोपाल किसन चव्हाण,अ.काशीक, रामप्रसाद ठाकरे, नरेंद्र छालीवाल,अनिल खैरे, अंबुजा वानखेडे, नितीन राठोड, संतोष राठोड, सलीम बेग, संदीप घोरसडे, सुनील राठोड,कुणाल अग़वाल, नितीन कदम, परमेश्वर राठोड, सुभाष पवने,जयदिप मासोतकर,बाला होलगरे,मतीन शाह,केशव साखरकर, मुकेश सुरजूसे,दिपक चौधरी,संजय पोहणे,ओम तायडे, अनिकेत लवटे,वाजीद खान, गजानन पांडे, शंकर लवटे,रुपेश गाढवे,राम ठाकरे,दिपक हेडा, प्रथमेश राऊत, राधेश्याम राठोड,शालीग़ाम गावंडे, रविंद्र ठाकरे,संदिप हेडा,जुनेद अहेमद,मुदासिर कादरी, सुधाकर ठाकरे, संजय ठाकरे आदी शेकडोंच्यावर खातेदार ठेविदार यांची उपस्थिती होती.
बॉक्स ….,..
आरोपींच्या संपत्तीचा लिलाव करुन परतावा करणार-ओजस वाळले आजघडीला सुलतानी संकटामुळे झालेली वित्तहानी भरून निघेल मात्र एखाद्यांचा जीव गेला तर भरपाई होणे शक्य नाही या करिता सातही शाखेच्या खातेदार ठेविदार यांचे सुरक्षा ठेव परत करण्यासाठी निधी सुरक्षा समिती गठीत करण्यात आली आहे. पोलिस प्रशासन, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस तुकड्या आरोपींचा शोध घेण्यासाठी निघाले आहेत.आरोपींना अटक झाल्यानंतर संपूर्ण सखोल चौकशी करण्यात येईल.कुणीही घाबरू नका लवकरच आरोपी कोठडीत दिसतील.मुख्य आरोपींच्या संपत्तीचा लिलाव करुन खातेदार ठेविदार यांना परतावा अवश्य मिळेल.आरोपींचा हितसंबंध जोपासणाऱ्या व्यक्तींशी कुठलाही आर्थिक व्यवहार करु नये केल्यास आपली फसगत होऊ शकते असे आवाहन पुसद शाखेचे व्यवस्थापक ओजस जैन यांनी केले आहे. सर्व खातेदार ठेविदार यांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे..
Discussion about this post