लक्षदिप बहुउद्देशिय संस्था कुडाशी व ग्रामपंचायत खट्याळ यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित पेसा दिनानिम्मित व शिवणकाम व कर्तन प्रशिक्षण प्रमापत्र वाटप सोहळा उत्साहत सपंन्न….!
भारतीय परंपरेप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रजलन व प्रतिमा पुजननाने करण्यात आले. प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवर यांचा सत्कार समारंभानंतर लक्षदिप संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.लक्ष्मण एल. चौधरी यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविका मांडली व प्रास्ताविकेत बोलतांना उपस्थितांना प्रथम पेसा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. व संस्थेची ओळख करुन दिली व संस्थेचे कार्य थोडक्यात मांडले.
शिवणकाम प्रशिक्षणासाठी खट्याळ ग्रामपंचायतिच्या ५% पेसा निधी मधुन प्रशिक्षणासाठी अर्थ सहाय्य देण्यात आले. खट्याळ, विजयपुर, वर्दडी गावातील स्वयं सहायता समुहातील ६० महिलांना लक्षदिप बहुउद्देशिय संस्था कुडाशी या संस्थेच्या संयुक्त विद्यामाने शिवणकाम प्रशिक्षण १२ ऑक्टोबर ते १२ डिसेंबर २०२४ या कालावधीत (दोन महिने) शिलाई प्रशिक्षणा मध्ये शिलाई मशिनच्या प्राथमिक माहीतीसोबत ब्लाऊज शिवण्यापर्यत व विविध प्रकारचे डिजाईनचे संपुर्ण प्रशिक्षण संस्थेने दिले.
“नारी घे तु उंच भरारी… फिरुन पाहु नकोस तु मागारी” हा स्लोगन डोळ्यासमोर ठेवुन. महिला सबलीकरण व्हावे म्हणुन ६० महालांना शिवणकाम व कर्तन प्रशिक्षण देऊन देऊन स्वतः आत्मनिर्भर होण्यास महिलांना तयार केले. आज प्रशिक्षण पुर्ण केलेल्या ५०-६० टक्के महिलांनी स्वतःआपल्या स्वयसहाता समुहातुन कर्ज घेऊन शिलाई मशिन खरेदी केली आणि स्वतःचा व्यवसाय देखील सुरु केला व करतील.
पेसा दिन व शिवणकाम व कर्तन प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप सोहळा प्रसंगी कार्यक्रमाचे उध्दघाटक म्हणुन साक्री तालुक्याच्या लाडक्या आमदार श्रीमती मंजुळाताई तुळशीराम गावित,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. तुळशिराम दादा गावित तसेचं प्रमुख पाहुणे मा.एस.बी.सोनवणे (पं.स. गट विकास अधिकारी साक्री) यांच्या उपस्थित प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. याप्रसंगी मा.शिवाजी साबळे (उप-अभियंता बांध.वि.पं.स.साक्री) साहेब, मा.संदिप सुर्यवंशी (पेसा व्यवस्थापक धुळे) मा.हितेश शेलार (पेसा व्यवस्थापक साक्री) मा.जे.पी.खांडे, (विस्तार अधिकारी) मा.सदिप बोरसे, (उमेद सा.ता.व्यवस्थाक) मा.सुरेश पवार (पेसा संघर्ष समिती अध्यक्ष) सौ.प्रमिला अहिरे (सरपंच खट्याळ) अनिता राजु जगताप, (सरपंच शिव) सौ.सुनंदा शिंदे (ग्रामसेवक शिवखट्याळ) लक्षदिप बहुउद्देशिय संस्था कुडाशी अध्यक्ष श्री लक्ष्मण चौधरी व सचिव अशोक ठाकरे कृषी मित्र सुरेश चौरे,विजय बागुल सर्व पदधिकारी, खट्याळ ग्रामपंचायच पदधिकारी व खट्याळ, विजयपुर, वर्दडी गावातील ग्रामस्थ, महिला प्रशिक्षणार्थी उपस्थितीत होते.
या प्रसंगी सुत्र संचालन मा.डि.के गवळी व आभार श्री नितीन गांगुर्डे यांनी मांडले.

Discussion about this post