मनोज वाजे ओझरखेड दिनांक २०/१२/२०२४ नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर /ईगतपुरी या दोन्ही तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी तसेच शेतकरी गटातील प्रमुख शेतकऱ्यांना कृषी विषयक राज्यातील नवनविन तंत्रज्ञान, संशोधन याबाबतची माहिती मिळावी व शेतकरी यांनी आपल्या शेतात या संशोधनाचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, शेतकरी सक्षम बनावेत आणि नव नवीन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये त्यांचा सहभाग वाढावा. या उद्देशाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, प्रकल्प संचालक नाशिक यांच्या कडून सन २०२४-२५ वर्षांकरिता ‘जैन हिल्स’ जळगाव येथे दोन दिवसीय, राज्यांतर्गत शेतकरी अभ्यास प्रशिक्षण दौऱ्याचे (सहलीचे) आयोजन करण्यात आले होते.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पंचविस शेतकरी व इगतपुरी तालुक्यातील पंचविस शेतकरी असे एकुण पन्नास शेेतकरी असुन जळगाव येथील भवरलालजी जैन यांची इरिगेशन कंपनीच्या जैन हिल्स ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ या प्रात्याक्षिकला भेट दिली. यावेळी जैन इरिगेशन कंपनीचे आधुनिक इलेक्ट्रॉनिक मोटारपंप आणि सोलार सिस्टीमपंप आणि जैन कंपनीचे विविध प्रकारचे पाईप तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचे ठिबक सिंचन प्रकार दाखविण्यात आले. यातील कमी दाबाचे ठिबक सिंचन आणि सायकलीवरील सोलर सिस्टीम पंपाला शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दर्शविली आहे.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी पथदर्शी प्रात्यक्षिक शेतातील जसे ऊस, कापूसू, सोयाबीन, गहूू, केेळी, कांंदा, टोमॅटो, हळद, आलेे, लसूूण, हिरवी मिरची यांंसारखी हंंगाामी व बिगर हंंगामी पिकांसाठी नव नवीन तंंत्रज्ञानाचा म्हणजेे गादीवाफा, त्यावर मल्चिंंग, ठिबकच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग, सिंचन ठिबकच्या दोन्ही बााजूूनेे दोन नळ्या आणि त्यातूनू खतेे सोडणेेचा वापर करण्यात आलेला शेतकऱ्यांनी बघितले.
त्याशिवाय नेेटहाऊस, पॉलिहाऊस व ग्रीनहाऊस मधील फळबाग व इतर पिकेे माती विरहीत भविष्यातली बटाट्याची शेतीे बघीतली तसेच सघन व अतिसघन पद्धतीनेे लागवड केेलेेल्या पेेरू, आंबा, सिताफळ, डाळिंब, अॅॅव्होकाडो, चिकूू , बोर, जांंभूळू, मोसंंबी, संंत्री, स्वीट ऑरेंंज, पपई, लिंबूं या फळांच्या बागा बघितल्या. तसेच टिश्यूकल्चर पद्धतीनेे तयार केेली जाणारी केेळी, डााळींंब, स्ट्रॉबेरीे, स्वीट ऑरेंंज यांंची रोपेे-कलमेे, सीडलिंंग, लााल व पांंढऱ्या कांंद्याचेे बियाणेे, शेतीेकामासाठी वापरली जाणारी वेेगवेेगळ्याा प्रकारची अवजारेे या असंंख्य नावीन्यपूर्ण गोष्टी शेेतकऱ्यांंना येथेे पहाावयास मिळााल्या. प्रामुख्याने आंबा लागवडीची पद्धत, झाडांची निगा राखणे, वेळोवेळी आंब्याची फरवाणी, आंब्याची छाटणी करुन काड्या वाढविणे, आंबेच्या एकुण प्रजाती अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मार्गदर्शकांसोबत आंबा लागवड, फवारणी, छाटणी यासंदर्भात चर्चा, विचार विनिमय सल्ला मसलत करून शेतकऱ्यांनी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
नंतर जैन हिल्स कंपनीच्या शेतकऱ्यांच्या टॉमेटो शेतीला भेट दिली. या दोन दिवसीय प्रशिक्षणात कृषी आत्मा प्रकल्पाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेंद्र सोनवणे तसेच कृषी सहायक हरीदास पवार, अशोक कर्डेल उपस्थित होते. सदर प्रशिक्षणासाठी जैन इरिगेशन कंपनी जळगाव येथील अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Discussion about this post