शेतातून पिकाला पाणी भरून दुचाकीने एरंडोल कडे घरी परत येत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने ठोस मारले त्यात शेतकरी लहूदास पोपट महाजन वय ५५ वर्ष हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेने उपचारासाठी जळगाव येथे नेत असताना पिंपळकोठे गावानजीक त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना २३ डिसेंबर २०२४ रोजी भल्या पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमार धरणगाव रस्त्यावर बजरंग ट्रेडर्स या सिमेंट आसारीच्या दुकानाजवळ घडली.एरंडोल येथील शेतकरी लहूदास पोपट महाजन हे ओम नगर मध्ये राहत होते.
महाजन हे त्यांच्या बजाज कंपनीच्या लाल रंगाच्या सिटी १०० मोटर सायकल क्रमांक एम एच १९ डी इ ९७२१ दुचाकीने पिकाला शेताला पाणी भरण्यासाठी गेले होते.
पाणी भरण्याचे काम आटोपून ते त्यांच्या दुचाकीने एरंडोल कडे घरी परत येत असताना धरणगाव एरंडोल रस्त्यावर बजरंग ट्रेडर्स सिमेंट असारी च्या दुकानाजवळ समोरून येणाऱ्या मोटर सायकल क्रमांक एम एच १९ डी एक्स ६३५७ क्रमांकाच्या दुचाकीने समोरासमोर ठोस मारून अपघात झाला त्यात लहूदस महाजन हे गंभीर जखमी झाले.
त्यांना जळगाव येथे उपचाअर्थ नेत असताना त्यांचे निधन झाले.याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला मुन्ना दाखल करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार, कपिल पाटील, संतोष चौधरी, नितीन पाटील, योगेश महाजन हे पुढील तपास करीत आहेत.
Discussion about this post