
सोलापूर – ख्रिसमस व नाताळ सणाच्या निमित्ताने आज दि फर्स्ट चर्च येथे सर्व ख्रिस्ती बांधव एकत्रित येऊन उपासना व ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दि फर्स्ट चर्च च्या वतीने ख्रिस्त जन्मोत्सव म्हणून रंगभवन ते सात रस्ता रॅली काढण्यात आली

या रॅली मध्ये पूर्ण भक्ती भावाने प्रभू येशू चे गीत गात नाचत जय घोष करत ख्रिस्ती बांधव या रॅली मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले. या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, नाताळ शुभेच्छापत्र देऊन परस्परांचे अभिनंदन केले. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवून नाताळ सण साजरा करतात

ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री – नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. यामध्ये चॉकलेट, केक, इ. वेगवेगळे पदार्थ बनवून हा सण साजरा करतात.यावेळी दि फर्स्ट चर्चचे फादर जयकुमार घाटे व स्टॅंडिंग कमिटी चे सदस्य उपस्थित होते.
Discussion about this post