MLA Babanrao Lonikar – आमदार बबनराव लोणीकर नी परतुर नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना खडसावले.लोकप्रतिनिधींचा मानसन्मान करावा लागेल, प्रत्येक विभागाचे काम चोख करावं लागेल – लोणीकरांनी नगरपालिका प्रशासनाला धरलं धारेवर.२८ ट्रान्सफॉर्मर आणि ३०० पोल दिले तरी लाईटच्या तार लटकलेल्या का…? वीजवितरणला विभागाला लोणीकर यांनी झापले.
नगरपरिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या म्हाडाच्या बोगस घरकुलांवरून आमदार बबनराव लोणीकर आक्रमक; प्रत्यक्ष पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिट करणार असल्याचे Babanrao Lonikar ची माहिती.प्रतिनिधी परतूर नगर परिषदेंतर्गत मोठ्या प्रमाणात गाईंची कत्तल केली जात असल्याच्या वारंवार तक्रारी येत असून संपूर्ण देशभरात गाईला राजमातेचा दर्जा असताना परतूर शहरात गायीची होणारी कत्तल थांबली नाही तर पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई लागेल पोलीस यंत्रणेने गाईंच्या कत्तली संदर्भात कठोर भूमिका घेत शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे अपेक्षित आहे
असे असताना गोवंश हत्या बंदीचा कायदा असताना देखील पोलिसांकडून कुठलीही दखल घेतली जात नाही किंवा या संदर्भात कत्तल करणाऱ्या दोषींवर कुठलीही कठोर कारवाई केली जात नाही असे निदर्शनास यत असल्याने जर पोलिसांनी याबाबत कठोर भूमिका घेतली नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस करावी लागेल असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी आज केले.
तहसील कार्यालय परतूर येथे आयोजित विविध विकास कामांच्या आढावा बैठकीदरम्यान आमदार बबनराव लोणीकर बोलत होते यावेळी पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की, शहरातील अतिक्रमण रस्त्यावर लागणारे गाडी यामुळे रहदारीला मोठा अडचणी निर्माण होत असून याबाबत अनेक नागरिकांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. प्रशासनाने या तक्रारींची तात्काळ दखल घेणे अपेक्षित आहे परंतु मुजोरी करणारी अधिकारी यासंदर्भात कुठलीही दखल घेत नाहीत असे निदर्शनास आले आहे.
याउलट रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून पाठबळ दिले जात असल्याचे देखील बोलले जात आहे त्यामुळे असा गैरप्रकार करणारे अधिकाऱ्यांची कुठलीही गयी केली जाणार नाही अशा कडक शब्दात आमदार बबनराव लोणीकर यांनी नगरपालिका प्रशासनाला सुनावलेमागील पंचवार्षिक मध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पदावर कार्यरत असताना आपण स्वतः परतूर नगर परिषदेसाठी ४५ कोटी रुपये निधी मंजूर करत घनकचरा प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली होती.
या प्रकल्पाच्या माध्यमातून परतुर शहरातील सांडपाणी व्यवस्थापन केले जाणार होते परंतु नगरपालिकेच्या तत्कालीन अध्यक्ष व प्रशासनाने बोगस एजन्सीची नेमणूक करून या सर्व प्रकारांमध्ये हलगर्जी व अपहर केल्याचे निदर्शनास येत आहे या सर्व बाबींची आपण गंभीरतेने दखल घेतली असून या संदर्भात नगर विकास मंत्र्याकडे तक्रार करत चौकशी करण्याचे आदेश लवकरच काढले जातील त्याचप्रमाणे सदरील घनकचरा प्रकल्प का पूर्ण होऊ शकला नाही असा प्रश्न उपस्थित अधिकाऱ्यांना केला असता कोणालाही उत्तर देता आले नाही यावरून आमदार बबनराव लोणीकर यांनी नगरपरिषद प्रशासनाला खडसावले
परतूर नगरपरिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या ४८ स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवेत कायम आपण स्वतः प्रयत्न करणार असून निश्चितपणे या सर्व बाबी संदर्भात मी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहे असे मत आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले तसेच, नगरपालिका प्रशासनाच्या वतीने लोकप्रतिनिधींचा मान सन्मान राखला जात नाही अशा देखील वारंवार तक्रारी लोकप्रतिनिधीं मार्फत केल्या जात आहेत हे अत्यंत गंभीर बाब असून शेकडो लोकांनी प्रभाग विकासाच्या उद्देशाने संबंधितांना निवडून देत नगर परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलेले असताना अशा सर्व लोकप्रतिनिधींचा मानसन्मान करावा लागेल,
प्रत्येक विभागाचे काम चोख करावं लागेल परंतु असे होताना दिसत नाही त्यामुळे नगरपरिषदेच्या कुठल्याही अधिकाऱ्याने राजकारण न करता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा मानसन्मान करण्यापेक्षा आहे असे न केल्यास याची गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला.परतूर नगर परिषदेला आतापर्यंत नव्याने २८ ट्रान्सफॉर्मर आणि ३०० पोल दिले आहेत असे असले तरी अद्याप पर्यंत कुठलीही जोडणी करण्यात आली नाही.
संपूर्ण परतुर शहरांमध्ये लाईटच्या तारा सगळीकडे लटकलेले असून त्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही त्यामुळे या बाबीची गंभीर दखल घेत वीज वितरण प्रशासनाने तात्काळ या संदर्भात उचित कारवाई करण्या अपेक्षित आहे असे असताना वीज वितरण चे अधिकारी व कर्मचारी परतु शहरात लटकलेल्या तारा संदर्भात अद्याप पर्यंत अजिबात गंभीर नाहीत असेच दिसून येते त्यामुळे वीज वितरण अधिकारी व कर्मचारी एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यानंतर या ठिकाणी शब्दात आमदार बबनराव लोणीकर यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना झापलेसंजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मानधन स्वरूपात २ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून या योजनेअंतर्गत श्रावण बाळ विधवा परित्यक्ता दिव्यांग दुर्धर आजार ग्रस्त बांधवांना मानधन उपलब्ध करून देण्यात आले असून या माध्यमातून गोरगरीब दिन दलित काबाडकष्ट करणाऱ्या अनेक महिला व पुरुषांना या मानधनाच्या रूपाने छोटी खाली मदत केली जाणार आहे अशी माहिती देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिली.
या योजनेअंतर्गत आतापर्यंतच्या लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही अशा पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देत पुन्हा एकदा बैठकीच्या आयोजन करण्यात यावे अशी सूचना देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी परतुर तहसीलदार यांना केली.परतूर नगरपरिषदे अंतर्गत गुंठेवारीचा प्रश्न ऐरणीवर आला असून लोकप्रतिनिधींनी नगरपरिषद प्रशासनावर प्रचंड नाराजी व्यक्त केले आमदार बबनराव लोणीकर यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीदरम्यान नगरसेवक व्यापारी गावातील प्रतिष्ठित नागरिक या सर्वांनी नगरपालिका प्रशासनावर रोष व्यक्त करत हेतूपुरस्सर टाळाटाळ केली जात असल्याची वेदना आमदार बबनराव लोणीकर यांच्यासमोर मांडली.
यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी गुंठेवारी कायद्यासंदर्भात संबंधित तहसीलदार व मुख्याधिकारी नगरपरिषद परतुर यांना सूचना केली गुंठेवारी नोंदणी करण्यासंदर्भात आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रशासनाला सूचना देत लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी कठोर शब्दात सूचना केली.परतूर पारधीवाडा येथे आतापर्यंत कुठली भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे बाब लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित केल्यानंतर या ठिकाणी भौतिक सुविधा बरोबरच शबरी योजना अंतर्गत घरकुल समाज मंदिर किंवा सार्वजनिक शौचालय देखील उपलब्ध करण्यात आलेले नसल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश आमदार बबनराव लोणीकर यांनी पालिका प्रशासनाला दिले.
पारधी वडा परिसराला वीर बिरसा मुंडा नगर नाव देण्याचा प्रस्ताव व ठराव नगरपालिका प्रशासन घेतलेला असून अध्यापर्यंत त्या संदर्भात कुठली कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात महापुरुषांची अवहेलना केली जात असल्याची भावनांमध्ये आहे त्यामुळे या संदर्भात तात्काळ कार्य करण्याची सूचना देखील यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी केलीउपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांना सोबत घेऊन नगरपालिकेने बांधलेल्या बोगस घरांची पाहणी करणार असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आढावा बैठकीदरम्यान स्पष्ट केले.
शहर किंवा ग्रामीण भागातील अनधिकृत बांधण्यात आलेल्या घरांना अधिकृत करण्यासंदर्भात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे देखील लोणीकरांनी स्पष्ट केले. परतूर शहरात बोगस बांधण्यात आलेल्या घरकुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पाडण्याची परवानगी मागा अशी सूचना देखील आमदार लोणीकरांनी नगरपरिषद प्रशासनाला केली. रेल्वे भरण्याची मागणी केली असता या ठिकाणी बस स्थानक उभारण्यासाठी नगरपालिकेने प्रस्ताव तयार करून पाठवावा आपण शासन दरबारी हा विषय मांडून निश्चितपणे मिनी बस स्थानकाचा विषय मार्गी लाव असा शब्द एवढे आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला.
यावेळी तहसीलदार प्रतिभा गोरे तहसीलदार सोनाली जोंधळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मिठेवाड वाघमारे उपविभागीय कृषी अधिकारी श्री रोडगे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता श्री चव्हाण उपकार्यकारी अभियंता श्री गायकवाड श्री लांडगे, जलसंधारणचे कार्यकारी अभियंता श्री वाघमारे निम्न दुधना प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती कोरके गटविकास अधिकारी श्री तांगडे गटविकास अधिकारी जालना श्री पवार सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद जिल्हा परिषदच कार्यकारी अभियंता श्रीमती सलगर उप अभियंता श्री सुगंधे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता श्री मस्के यांच्या सह अनेक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Discussion about this post