
तालुका प्रतिनिधी : उमेश कोटकर
वरोरा : तालुक्यातील पिंपळगाव मारोती या छोट्याश्या खेड्यातील दोन्ही भाऊ भारतीय सैन्यामध्ये सेवा करतात. अक्षय निकुरे यांचे वाहन खोल दरीत कोसळल्याने अपघात झाला. या वाहनामध्ये १८ जवान असून पाच जवान शहीद झाले. याबाबत रजेवर वर्धा या स्वगावी आलेल्या जवानांनी घरी येऊन निकुरे कुटुंबाला सदर माहिती दिली.
अक्षय दिगंबर निकुरे हे बीए फायनल ला शिक्षण घेत असतानाच भारतीय सैन्य दलात वयाच्या २१ व्या वर्षी सन २०१८ मध्ये रुजू झाले होते. त्याचे वडील अल्प भूधारक शेतकरी असून वडील आणि आई दोघेही घरची चार एकर शेती करतात. त्यांचे अपघाती निधन झाल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज घरची परिस्थिती हलाखीची असताना आपले दोन्ही मुले सैन्य दलात पाठवणाऱ्या या वडिलांचे कौतुक परिसरातील जनता करीत आहे.
प्राप्त माहितीनुसार, घरी आई-वडील आणि भारतीय सैन्य दलात असलेला एक भाऊ असा परिवार असून शहीद जवानांचे उद्याला स्वगावी शासकीय इतमात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे..
Discussion about this post