

महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री श्री. शंभुराज देसाई यांची किल्ले प्रतापगड येथे भेट, सातारा दि. 25 तसेच किल्ले प्रतापगड हा ऊर्जा स्त्रोत असुन याच्या संवर्धनासाठी जिल्हा वार्षिक नियोजन योजनेतुन व शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल असे सांगितले.तसेच या कामासाठी स्थानिकांनी सहकार्य करावे, त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल,त्याचबरोबर किल्ले प्रतापगडच्या संवर्धनाबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेतली जाईल असे पर्यटन मंत्री श्री.शंभुराज देसाई यांनी सांगितले. किल्ले प्रतापगड संवर्धन कामाची पाहणी करताना पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, विजय नायडू यांची उपस्थिती होती..
Discussion about this post