सोयगाव :
वडगाव (ती) येथे राष्ट्रीय सुशासन दिन साजरा
सोयगाव
युवकांनी राष्ट्रात सुशासन आणण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन सोयगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे ॲड. रामदासजी महाजन यांनी तालुक्यातील वडगाव (तिग्जी) येथे सुशासन दिनानिमित्त बुधवारी (दी २५) केले.
स्वतंत्र भारताचे १० वे पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात २५ डिसेंबर हा राष्ट्रीय सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय,भारत सरकार यांच्या नेहरू युवा केंद्र,छत्रपती संभाजीनगर संलग्नित सेवा संकल्प युवा मंडळ,सोयगाव व विधी सेवा प्राधिकरण,सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य ना.धो.महानोर माध्य.व उच्च माध्य.विद्यालय,वडगाव (तिग्जी) येथे बुधवारी सुशासन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी ‘तालुका दिवानी व फौजदारी न्यायालयाचे ॲड. रामदासजी महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.’ यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आपले समाजाप्रतीचे कर्तव्य व जबाबदारी यांची जाणीव करून दिली व युवकांनी राष्ट्रात सुशासन आणण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही केले.
त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत कार्यालय,शिंदोळचे ग्रामपंचायत अधिकारी लाभले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक आर.एन.पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सेवा संकल्प युवा मंडळाचे अध्यक्ष जगदिश सोनवणे यांनी केले.
यावेळी सातमाळा बंजारा शिक्षण संस्थेचे सचिवडॉ.एस.एस.राठोड, संचालक,सुनिल पवार,विद्यालयाचे प्राचार्य.जे.व्ही.चव्हाण,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवा संकल्प युवा मंडळाने अथक परिश्रम घेतले.
फोटो ओळ :- सोयगाव -वडगाव (तिग्जी) येथे सुशासन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सोयगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे ॲड. रामदासजी महाजन व उपस्थित मान्यवर
Discussion about this post