गडचिरोली :: महाविकास (इंडिया) आघाडतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उबाठा ), अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सह इतर पक्ष आणि सामाजिक संघटनाची सर्वपक्षीय बैठक पार पडली.
देशात आणि राज्यात सुरु असलेली अराजकता, देशाच्या सर्वोच्च स्थानी असणाऱ्यांकडून वारंवार महापुरुषांचा होत असलेला अवमान, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेले अवमानजनक वक्तव्य, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख व परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्घृण हत्येचा निषेध व्यक्त करण्याकरीता व चौकशी ची मागणी व अस्या विविध मुद्याना घेऊन निषेध व्यक्त करण्याकरीता, गडचिरोली जिल्ह्यातील महाविकास (इंडिया ) आघाडीतील घटक पक्ष व जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांची सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली , या बैठकीत संविधान बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी, गडचिरोली शहरात शिवाजी महाविद्यालय ते इंदिरा गांधी चौक पर्यंत निषेध मोर्चा व त्यानंतर राजीव गांधी सभागृह येते निषेध सभा घेण्यात येणार आहे. संविधान बचाव संघर्ष समितीच्या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अखिल भारतीय रीपब्लिकन पक्षाचे नेते रोहिदास राऊत, शिवसेना (उबाठा ) जिह्वाप्रमुख वासुदेव शेडमाके, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे नेते देवराव चवळे, सामाजिक कार्यकर्ते वसंत कुलसंगे, सतीश विधाते, विजय गोरडवार, ऍड. कविता मोहरकर, कुसुमताई आलाम, सुरेश भांडेकर, प्रदीप भैसारे, माधव गावड, राहुल भांडेकर, महेंद्र लटारे, नितेश राठोड, अमोल कुळमेथे, नहिम शेख, जावेद खान, काशिनाथ भडके, पौर्णिमा भडके, कविता उराडे, रिता गोवर्धन, सुशील हुलके, प्रल्हाद रायपुरे, ज्योती उंदिरवाडे, राजन बोरकर सह इतर पक्षाचे व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
Discussion about this post