दिव्यांग बांधवांसाठी करणार उपोषण
आज दिनांक २४ डिसेंबर २०२४ प्रांताधिकारी यांना राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पिंपळगाव हरेश्वर,समर्थ दिव्यांग संस्था शिंदाड यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. हा गेल्या २०२१मार्च पासून दिव्यांगांसाठी सुरू असलेला लढा जो ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळणारा २०१८ जी आर नियामा नुसार ५% निधी, ५०%घरपट्टी सुट,घरकुल लाभ,संजय गांधी निराधार,रेशन विभाग,शासन धोरण चांगले असते मात्र ठरून दिलेल्या वेळेत होत नसल्याने दिव्यांग बंधू-भगिन यांना वारवार तहसील प स फेऱ्या माराव्या लागत आहे, पिंपळगाव हरे ग्राम पंचायती ५%निधीच्या लाभासाठी दिव्यांगां कडून वस्तू खरेदीची बिल घेतली मात्र त्याचा लाभ दिला नाही.
या आणि अशा अनेक गोष्टींना दिव्यांग बंधू भगिनी यांना संघर्ष करावा लागतो आहे म्हणून म्हणून प्रांत अधिकारी,जिल्हाधिकारी,मा मुख्यमंत्री,मा राष्ट्रपती यांना निवेदन दिले आहे व जर यावर अंमलबजावणी १५ जानेवारी पर्यंत वरील विषय मार्गी लागला नाही तर १६जानेवारी २०२५ रोजी पासून उपोषणाला बसणार आहोत,असे विकास लोहार यानिसंगितले. शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पिंपळगाव अध्यक्ष विकास लोहार भारत वाघे प्रमोद शिंपी सुनील लोहार समर्थ दिव्यांग संस्था शिंदाड अध्यक्ष परमेश्वर पाटील भागवत पाटील महेश पाटील यांनी दिले निवेदन
Discussion about this post