निवेदन
प्रति,
मा. जिल्हाधिकारी,
परभणी जिल्हा,
महाराष्ट्र शासन.
विषय: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरी कायम करण्याबाबत.
आदरणीय महोदय,
नम्र विनंती आहे की, आम्ही “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” अंतर्गत प्रशिक्षण घेणारे उमेदवार असून, आम्ही शासनाने लागू केलेल्या या योजनेचा लाभ घेत प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कार्य केले आहे. योजनेच्या माध्यमातून आम्हाला व्यावसायिक कौशल्ये व अनुभव मिळालेला असून, संबंधित आस्थापनेतील कार्यप्रदर्शनाबाबत सकारात्मक अभिप्राय देखील मिळाला आहे.
जीआर क्र. संकीर्ण-2024/प्र.क्र.90/व्यशि-3, दिनांक 09 जुलै 2024 नुसार, प्रशिक्षणार्थींची कार्यक्षमता समाधानकारक असल्यास, संबंधित आस्थापनेने प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरीवर ठेवण्याची तरतूद आहे. परंतु, संबंधित आस्थापनेने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.
तसेच, आम्हाला नोकरी कायम करण्यासाठी आवश्यक त्या पावलं उचलण्यात यावी यासाठी आपले मार्गदर्शन आवश्यक आहे. आम्ही नोकरीसाठी पात्र असून, आमच्या कर्तृत्वाच्या आधारे आम्हाला न्याय मिळावा, अशी आमची विनंती आहे.
यादरम्यान, जोपर्यंत संबंधित आस्थापनेत नोकरी मिळत नाही, तोपर्यंत आम्हाला “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” चा कालावधी वाढवून दिला जावा, जेणेकरून आम्ही अधिक काळ प्रशिक्षण घेऊ शकू आणि अधिक चांगल्या प्रकारे कार्यप्रदर्शन दाखवू शकू. हे आमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
मागणी:
- संबंधित आस्थापनांवर “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” च्या जीआरची अंमलबजावणी करून, नोकरी कायम करण्यासाठी निर्देश देण्यात यावेत.
- योजनेचे योग्य पालन होत असल्याची खात्री करण्यासाठी संबंधित विभागास सूचना द्याव्यात.
- जोपर्यंत नोकरी मिळत नाही, तोपर्यंत प्रशिक्षणार्थींचा कालावधी वाढवून दिला जावा, जेणेकरून त्यांचा अनुभव अधिक वाढवता येईल.
आपल्याकडून या विषयावर तातडीने सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद!
आपले विश्वासू,
1.प्रदीप मोरे
2शिवाजी दहिफळे
3 रामराव राठोड
4 गोविंद लवंदे
Discussion about this post