वाशिम ( प्रतिनिधी ) प्रवीण जोशी यांच्याकडून :- एक उपक्रम सुरु करतो आहे वाशिम शहरातील शासकीय बंद अवस्थेतील धूळखात पडलेले बंगले वास्तू निवासस्थान . कारण याच्या उभारणीत लागलेला पैसा कष्टकरी मध्यमवर्गीय होतकरू प्रामाणिक जनता जनार्दनाच्या घामाचा पैसा लागलेला आहे हे विसरून चालणार नाही . हा शासकीय वैभव संपन्न असलेला गुलमोहर नावाचा बंगलाआहे या बंगल्यात आतापर्यंत कॅप्टन ,पोलीस अधिकारी निवासी जिल्हाधिकारी असे अनेकांनी वास्तव्य केले मात्र आता या बंगल्याची अवस्था कशी झाली आहे बघा! बंगल्याची रंगरंगोटी झाली आहे असे वाटले की सध्या निवासी जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्रीमालठाणे साहेब येतील रहायला पण ते स्वप्न हवेतच विरलं आणि या बंगल्यात गवतच वाढलं सर्वत्र ! बंगला अधिकाऱ्यांना दिल्या जातो , त्या बंगल्याचे नूतनीकरण ,रंगरंगोटी करण्यात येते ,
लाखो रुपये खर्च होतात मात्र अधिकारी या बंगल्यात वास्तवास येतच नाही तर दुसरीकडे शासन नवीन निवासस्थान निर्माण करीत आहे. ह्या जुन्या वास्तूंचे करायचे काय? की या वास्तूंना भूतबंगल्याचे स्वरूप प्राप्त होवू द्यायचे का? हा पैसा मायबाप जनतेचा आहे त्यामुळे हे असे बंद बंगले जमीनदोस्त करून नवीन बांधकाम करा अन्यथा जागा बंगला पाडून मोकळी करा हे बंद शासकीय बंगले जणू प्रत्येकाला खुणावतात की आमच्या कडे बघा ! पण मात्र शासनाला बघायला फुरसतच नाही आता या तरुण तडफदार मा.फडणवीस सरकारकडून अपेक्षा आहे . हे शासन नक्कीच या बंगल्यांच्या वाटयाला उपेक्षित जगण्याचं दुर्भाग्य येऊ देणार नाही. कारण अशा अनेक वास्तू आहेत या बंगलाच्या अनेकांच्या अनेक आठवणी असतील शेअर करता आल्या तर नक्की शेअर करा व आपल्या गावातील शहरातील बंद शासकीय वास्तू त्यांचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी उजेडात आणा .
Discussion about this post