भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.मानखुर्द ( मुंबई) लाल्लुभाई अमित चंद कंपाऊंड येथील नॅशनल इंग्लिश हायस्कूलचा दिनांक २६ डिसेंबर ते २८ डिसेंबर पर्यंत चालू राहणाऱ्या २० व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.सन २००५ या वर्षापासून सुरू झालेल्या
या शाळेतील विद्यार्थ्यांनी आतापर्यंत भारतातील अनेक नामवंत संस्थेत प्रवेश मिळविला आहे.विद्यार्थ्याच्या शैक्षणिक बौद्धिक सांस्कृतिक विकासाबरोबरच त्यांच्या तील क्रीडा गुणांना वाव मिळावा या हेतूने शाळा दरवर्षी वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करीत असते, सालाबादप्रमाणे यंदाही शाळेने वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले असून त्यामध्ये शाळेच्या प्री प्रायमरी, प्रायमरी,व सेकंडरी विभागातील जवळ जवळ ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्राची मंचेकर यांनी सांगितले की,” खेळाडूंना सरकारी नोकरी मध्ये राखीव जागा असल्याने खेळाडूंना सरकारी नोकरी मिळू शकते.खेळात मुलांनी प्रावीण्य मिळवावे.” तर दुसरे प्रमुख पाहुणे सुभाष वाळवे यांनी सांगितले की ” खेळामुळे शारीरिक व्यायाम होतो, आजारांपासून दूर राहता येते,”तिसरे प्रमुख पाहुणे कलाकार दिग्दर्शक व क्रीडा शिक्षक सुधीर पवार यांनी उद्घाटन प्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या,व कबड्डी, लेझीम चे महत्व सांगितले.शाळेचे संचालक एड.सुनील भोवते हे मुलांना खेळण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देतात, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी लक्ष देतात.
या प्रसंगी पोलिस निरीक्षक प्राची मंचेकर, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी सुभाष वाळवे , पोलिस अधिकारी सतिश गुंजन, कलाकार दिग्दर्शक, क्रीडा शिक्षक सुधीर पवार,शाळेचे संचालक एड.सुनील भोवते, मुख्याध्यापिका सारिका डोंगरे, योगेश सानप, कमलेश वाघ, वसुंधरा शिर्के,एड.कल्पना भोवते, राष्ट्रीय खेळाडू सुनील गंगावणे, राज्य स्तरीय कबड्डी पट्टू भुमी मर्चंडे, आणि पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके आदी मान्यवर उपस्थित होते.शाळेच्या इतर शिक्षकांनी उद्घाटन प्रसंगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
Discussion about this post