.धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे… जेष्ठ पत्रकार भारत कवितके.भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चांदवड, रेणुका लान्स,मनमाड रोड, चांदवड जिल्हा नाशिक या ठिकाणी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती वर्ष निमित्त, राज्य अधिवेशन आणि धनगर जागृती परिषदेचे आयोजन मौर्य क्रांती महासंघा व्दारा करण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष बलभीम माथेले यांनी प्रसारमाध्यमांना पत्रका व्दारा कळविले आहे,
मुंबई कांदिवली पश्चिम येथील धनगर समाजाचे पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांनी धनगर समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.चांदवड होळकर वाडा ( रंग महाल) येथे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करुन मशाली चे प्रज्वलन,
चांदवड येथील होळकर ट्रस्ट चे सुभाष पवार यांचे हस्ते करण्यात येणार आहे.या दिवस भराच्या अधिवेशनात ओवी प्रबोधन कार्यक्रम,इंजि.शिवाजीराव शेंडगे,यांचे हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन, सत्यशोधक विचारांचे अनुयायी मारोतरावजी पिसाळ मामा यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध लेखक, विचारवंत आर.एस.यादव यांना सत्यशोधन प्रबोधनकार पुरस्कार, सरपंच सुनिताबाई बबनराव मिटकरी,ठेलारी नेते विठ्ठल भाऊ मारणर, आणि युवा उद्योजक हनुमंत दुधाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार, विविध क्षेत्रातील मान्यवर सन्मान सोहळा, चित्रकला राज्य स्तरीय विजेते पुरस्कार सोहळा, पुस्तक प्रकाशन सोहळा, असे अनेक भरगच्च कार्यक्रम म्हणजे समाज बांधवांना एक प्रकारे वैचारिक,
बौद्धिक खाद्याची मेजवानीच ठरणार आहे.या अधिवेशनातील प्रमुख उपस्थिती राजेंद्र बरकडे (निर्माता दिग्दर्शक) शिवाजीराव केसकर ( समाज कल्याण अधिकारी) , विठ्ठल राव संगापुरी, विनोद आण्णा खेमनार, पांडुरंग गायके, डॉ.प्रविण जगताप, उपस्थित राहणार आहेत.तुकाराम जानकर,मयुर जाधव,एड.उत्तमभाई कोळेकर, डॉ.विनोद वाघाळकर,संचित धन्वे,एड.विजय गोफणे आदी मान्यवर समाज बांधवांना समाजाच्या विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.प्रास्ताविक राजीव हाके सर,तर सूत्रसंचालन ची बाजू प्रकाश कुटे,तर आभार प्रदर्शन शैला नवघरे करणार आहेत.
अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून इंजि.लक्ष्मण व्हटकर मुंबई मनपा माजी उपायुक्त, कल्याण राव दळे अध्यक्ष बारा बलुतेदार महासंघ, आनंदा होनमाने उद्योगजक,इंजि.विनोद इंगोले मार्गदर्शक मौर्य क्रांती महासंघ,इंजि.
संतोष सातपुते कार्यकारी अभियंता, अंकुश निर्मळ प्रदेशाध्यक्ष धनगर कर्मचारी महासंघ,एम.बी.कुरणे मार्गदर्शक उरण मुंबई,पवन थोटे मार्गदर्शक, भारत कवितके मुंबई जेष्ठ साहित्यिक, सुभाष येळे उपाध्यक्ष पु.अहिल्यादेवी होळकर सेवा संघ,लखन रुपनर उद्योजक उपस्थित राहणार आहेत.
Discussion about this post